कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृह कर्मचारी आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून येथील कामकाज करू, अशी ग्वाही नूतन तुरुंग अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शुक्रवारी सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला.इंदुरकर म्हणाल, या कारागृहात कर्मचारीवर्ग कमी आहे. याची माहिती घेण्याचे काम नाही सध्या करीत आहे. येथील कामकाज कर्मचारी व प्रशासन यांच्यात समन्वय साधून मी करणार आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली तशी घटना घडू नये याकरिता आतील बंदोबस्त जैन प्रशासनाने पाहायचा आहे. तर जीन बाहेरील बंदोबस्त पोलीस प्रशासनाने पाहायच आहे.
याबाबत दीक्षित समितीने निर्देशित केलेल्या सूचनेनुसार बाहेरील बंदोबस्त हा ज्याच्या पोलीस स्टेशनचा विषय आहे . रोज रात्री बाहेरून गस्त घालने हे काम जिल्हा पोलिस प्रशासनाचे आहे. या गोष्टीची नोंद रजिस्टर मध्ये करणे ही त्यांची जबाबदारी आहे. यासोबतच कळंबा कारागृह आतील रुग्णालयाचा प्रश्नही महत्त्वाचा असून त्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बरोबर बोलणी करून त्यासंबंधी निर्णय घेण्याचे काम सुरू आहे.इंदुरीकर हे मूळचे नागपूर येथील असून २९ वर्षापूर्वी त्यांनी करून तुरुंग प्रशासनात तुरूंग निरीक्षक या पदावर कामाला सुरुवात केली.त्यानंतर नागपूर रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे मुंबई परभणी आणि येरवडा पुणे येते उपअधीक्षक म्हणून काम केले आहे.