गडहिंग्लज उपविभागातील संसर्ग, मृत्यूदर कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:23 AM2021-05-23T04:23:18+5:302021-05-23T04:23:18+5:30

: आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना गडहिंग्लज : गडहिंग्लज उपविभागातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि मृत्यूदर ...

Infections in Gadhinglaj subdivision, reduce mortality | गडहिंग्लज उपविभागातील संसर्ग, मृत्यूदर कमी करा

गडहिंग्लज उपविभागातील संसर्ग, मृत्यूदर कमी करा

Next

: आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

गडहिंग्लज : गडहिंग्लज उपविभागातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि मृत्यूदर चिंताजनक असून तो कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी केली.

गडहिंग्लज विभागातील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

शासकीय आरोग्य यंत्रणेसह संबंधित सर्व विभागांच्या कोरोना लढ्यातील कामगिरीबद्दल समाधानही त्यांनी व्यक्त केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे

प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुश्रीफ म्हणाले, कोरोनाची लक्षणे असतानादेखील अनेकजण उपचाराला उशीर करीत आहेत. त्यामुळे मृत्यूदर वाढत आहे. त्यामुळे जनजागृतीबरोबरच लोकांनीही चाचणी व उपचारासाठी पुढे येण्याची गरज आहे.

कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्यांच्या चाचण्या वाढवा, त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरणातच ठेवा. त्यासंदर्भात तलाठी व ग्रामसेवकांसह ग्राम दक्षता व प्रभाग दक्षता समित्यांना सतर्क करा, असा आदेशही त्यांनी दिला.

यावेळी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक हारुण सय्यद, बसवराज खणगावे, नितीन देसाई, अनुप पाटील, गुंड्या पाटील, महेश सलवादे आदी उपस्थित होते.

आरोग्य मंत्र्यांसोबत लवकरच बैठक

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाच्या सीटीस्कॅन मशीनसाठी निधी देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दवाखान्यात दुसरा ऑक्सिजन प्लांट बसविणे व ट्राॅमा केअर सेंटर सुरू करण्यासंदर्भात लवकरच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बैठक घेणार आहोत, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

फोटो ओळी- २२ गड०१

गडहिंग्लज येथील कोरोना आढावा बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत खोत उपस्थित होते.

Web Title: Infections in Gadhinglaj subdivision, reduce mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.