इचलकरंजी : वीटभट्टीसाठी माती उत्खनन करण्याकरीता रॉयल्टी भरून परवानगी देण्यासाठी इंगळी (ता.हातकणंगले) येथील तलाठ्यास २५ हजार रुपयांची लाच घेताना पाठलाग करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. संतोष सुभाष उपाध्ये (वय ३६, रा. केडीसी बॅँकेसमोर कुरूंदवाड, ता.शिरोळ) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली.संतोष उपाध्ये हा इंगळी येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. त्याच्याकडे एकाने वीटभट्टीसाठी माती उत्खनन करण्याकरीता रॉयल्टी भरून परवानगी मागितली. त्यासाठी तलाठी उपाध्ये याने संबंधित व्यक्तीकडे ३० हजार रुपयांची मागणी केली. या मागणीमध्ये तडजोड करून २५ हजार रुपये देण्याचे ठरविले. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.दरम्यान, उपाध्ये याने तक्रारदारास पैसे घेवून इचलकरंजीतील अप्पर तहसीलदार कार्यालय येथे बोलवले. कार्यालयाच्या परिसरात उपाध्ये याने तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारले. मात्र, त्याला पथकाची चाहूल लागल्याने त्याने तेथून पळ काढला. त्यामुळे पथकातील कर्मचारीही त्याचा पाठलाग करू लागले. सुमारे अर्धा किलोमीटर पीएनजी ज्वेलर्स परिसरात त्याला गाठून पथकाने रकमेसह ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत, सुनील घोसाळकर, कृष्णात पाटील, रुपेश माने, आदींच्या पथकाने केली.
इंगळीचा तलाठी २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 6:40 PM
Bribe Case Kolhapur- वीटभट्टीसाठी माती उत्खनन करण्याकरीता रॉयल्टी भरून परवानगी देण्यासाठी इंगळी (ता.हातकणंगले) येथील तलाठ्यास २५ हजार रुपयांची लाच घेताना पाठलाग करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. संतोष सुभाष उपाध्ये (वय ३६, रा. केडीसी बॅँकेसमोर कुरूंदवाड, ता.शिरोळ) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली.
ठळक मुद्देइंगळीचा तलाठी २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात पाठलाग करून पकडले, माती उत्खननासाठी मागितली होती लाच