शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

ऑक्सीजन निर्मितीच्या ठिकाणी विद्यूत जनरेटर बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 7:08 PM

CoronaVirus Kolhapur : राधानगरी, मुरगूड, मलकापूर, कोडोली, सीपीआर, आयजीएम. या ठिकाणी ऑक्सीजन निर्मीती तसेच उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज येथे रिफीलिंग प्रकल्प बसविण्यात येत आहे. या ठिकाणी विद्युत जनरेटर बसवावेत, येथील ट्रान्सफॉर्मरची क्षमता तपासून आवश्यकतेप्रमाणे ते बदलावेत, अशा सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी केल्या.

ठळक मुद्देऑक्सीजन निर्मितीच्या ठिकाणी विद्यूत जनरेटर बसवा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या आढावा बैठकीत सूचना

कोल्हापूर : राधानगरी, मुरगूड, मलकापूर, कोडोली, सीपीआर, आयजीएम. या ठिकाणी ऑक्सीजन निर्मीती तसेच उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज येथे रिफीलिंग प्रकल्प बसविण्यात येत आहे. या ठिकाणी विद्युत जनरेटर बसवावेत, येथील ट्रान्सफॉर्मरची क्षमता तपासून आवश्यकतेप्रमाणे ते बदलावेत, अशा सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई व कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी सर्वांनी नियंत्रण कक्षासाठी सेवा द्यावी, त्याबाबत तीन सत्रात नियोजन करावे असे आवाहन केले.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिवाजी विद्यापीठ येथील कोविड रूग्णालयात टास्क फोर्सने सेवा द्यावी, गृह विलगीकरणातील रूग्णांना रूग्णालयांनी सेवा पुरवावी. तसेच ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर खरेदी करावे अशी सुचना केली.यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील कोविड रूग्णालयात गरजूंना बेड उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय भरारी पथकामार्फत रूग्णालयाला भेट देऊन व्यवस्थापनाचे समुपदेशन करण्यात येणार आहे. ज्याला बेडची गरज नाही, अशा रूग्णांची हॉटेलमध्ये व्यवस्था करून त्यांच्यावर रूग्णालयामार्फत उपचार करण्यात येतील असे सांगितले.बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, कोल्हापूर मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव, उपाध्यक्ष डॉ. गीता पिल्लई, सचिव डॉ. किरण दोशी, सल्लागार डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. नीता नरके, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. अमर आडके, डॉ. शीतल देसाई, डॉ. शीतल पाटील, डॉ. मुकुंद मोकाशी उपस्थित होते.---फोटो नं २६०४२०२१-कोल-पालकमंत्री बैठकओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना ऑक्सीजन निर्मिती व कोरोना रुग्णांना सेवासुविधा याबाबत सुचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.--

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील