महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 08:07 PM2020-01-25T20:07:22+5:302020-01-25T20:43:33+5:30
डॉ. देशमुख म्हणाले, जिल्'ात महिला व तरुणींची छेड काढण्याचे प्रमाण वाढत आहे. कॉलेज युवतींना हुल्लडबाजांकडून त्रास दिला जातो. हे थांबविण्यासाठी ‘निर्भया’ पथकाची नेमणूक केली आहे; मात्र त्यातूनही काही घटना घडतात. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
कोल्हापूर : महिला व तरुणींच्या सुरक्षेला महत्त्व दिले जात आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याने महिलांच्या तक्रारींना प्राधान्यक्रम द्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच गतवर्षात अपघातात ३४५ जणांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
डॉ. देशमुख म्हणाले, जिल्'ात महिला व तरुणींची छेड काढण्याचे प्रमाण वाढत आहे. कॉलेज युवतींना हुल्लडबाजांकडून त्रास दिला जातो. हे थांबविण्यासाठी ‘निर्भया’ पथकाची नेमणूक केली आहे; मात्र त्यातूनही काही घटना घडतात. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हे प्रमाण कमी व्हावे, महिलांनी निर्भयपणे वावर करावा यासाठी कडक धोरण राबविले जात आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला महिलांच्या तक्रारी प्राधान्याने घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
गतवर्षात जिल्'ातील अपघातांमध्ये ३४५ लोकांचा बळी गेला आहे. तांत्रिक बिघाडापेक्षा मानवी चुकांमुळे अपघात घडण्याचे प्रमाण जास्त आहे. सुसाट वेग, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे, रात्री प्रवास करताना लागणारी डुलकी अशा कारणांमुळे अपघात घडतात. प्रादेशिक परिवहन विभाग व शहर वाहतूक शाखेकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अपघात वाढत आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवीत आहोत.
- सावकार रडारवर
जिल्'ात खासगी सावकारी अद्यापही सुरू आहे. अनेकांच्या विरोधात अर्ज दाखल आहेत. पतसंस्थेच्या नावाखाली कर्ज दाखवून अनेक सावकारांनी बेहिशेबी मालमत्ता मिळविली आहे. तशा प्रकारचे अर्ज आले आहेत. कायद्याचा आडोसा घेऊन खरेदी व्यवहार दाखवून सावकारी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना सर्वच पोलीस ठाण्यांना दिल्या असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
- साक्षीदाराला भत्ता मिळण्यासाठी प्रयत्न
गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी साक्षीदार महत्त्वाचा असतो. जिल्'ातील चंदगड, राधानगरी, आजरा तालुक्यांतील साक्षीदाराला जिल्हा न्यायालयात साक्ष देण्यासाठी यायला एक दिवस लागतो. तेव्हा त्याची रोजंदारी बुडते, शिवाय प्रवासखर्च होतो. त्यामुळे साक्षीदारांना ज्या-त्या दिवशी भत्ता मिळावा, त्यात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.