आयटकचा तरुण कार्यकर्ता जमीर शेख याचे अपघाती निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 11:12 AM2018-10-02T11:12:49+5:302018-10-02T11:16:57+5:30

डाव्या पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता आणि आयटक कामगार केंद्राचा पदाधिकारी जमीर कुतबुद्धिन शेख याचे अपघाती निधन झाले आहे.

jameer shaikh died due to accident in kolhapur | आयटकचा तरुण कार्यकर्ता जमीर शेख याचे अपघाती निधन

आयटकचा तरुण कार्यकर्ता जमीर शेख याचे अपघाती निधन

Next

कोल्हापूर : डाव्या पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता आणि आयटक कामगार केंद्राचा पदाधिकारी जमीर कुतबुद्धिन शेख ( वय 35 रा.देशभूषण हायस्कुलजवळ कोल्हापूर) याचे मध्यरात्री अपघाती निधन झाले आहे. पन्हाळ्याहुन परतताना हा अपघात झाला.

जमीर हा दिवंगत अवि पानसरे यांच्या बरोबर कामगार चळवळीत सक्रिय होता. त्यांनीच त्याला आपला वकिलीचा सहाय्यक म्हणून नोकरी दिली. आज अवि पानसरे यांचा स्मृतिदिन. त्यामुळे रात्री अकरा वाजेपर्यंत तो नियोजनात सक्रिय होता. रात्री 11 वाजता त्यासंदर्भात त्याने शेवटची पोस्ट सोशल मीडियावर टाकली आणि त्यानंतर दोन तासात होत्याचे नव्हते झाले.

अवि पानसरे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर जमीर हा जेष्ठ नेते गोविंद पानसरे यांचा आधार बनला होता. तो त्यांच्या वकिलाच्या कामात मदत करत असे. त्यांच्या गाडीचा चालकही  होता आणि पानसरे यांची वडिलांच्या मायेने तो सर्व देखभालही करत होता. त्यामुळे त्याच्या अशा अचानक निघून जाण्याने पानसरे कुटुंबीयांना ही मोठा धक्का बसला. मंगळवारी सकाळी मेघा पानसरे यांनी जमीरच्या कुटुंबायांची भेट घेतली आणि त्यांना आधार दिला. आयटकचा पदाधिकारी असल्याने त्याला कामगार न्यायालयात वकील म्हणून कामगारांची बाजू मांडण्याची मुभा होती. त्या कामातही तो सक्रिय होता. अकबर मोहल्ला परिसरातही तो सामाजिक चळवळीत पुढे असायचा.
 

Web Title: jameer shaikh died due to accident in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.