ज्योतिबाच्या जागरला लोटला जनसागर, महापुजेला उन्मेष (अश्व) अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 01:04 PM2022-10-02T13:04:57+5:302022-10-02T13:08:19+5:30

नवरात्रोत्सवाचा जोतिबा देवाचा जागर इतर देवदैवताच्या आधी साजरा होतो

Janasagar was offered to Jyotiba's shrine, Unmesha (horse) was offered to Mahapuja | ज्योतिबाच्या जागरला लोटला जनसागर, महापुजेला उन्मेष (अश्व) अर्पण

ज्योतिबाच्या जागरला लोटला जनसागर, महापुजेला उन्मेष (अश्व) अर्पण

Next

कोल्हापूर - कोल्हापुरात जोतिबाच्या जागरला भाविकांचा जनसागर लोटल्याचे दिसून आले. सातव्या  माळेला जोतिबाची चार मुक्तीचे प्रतिक दाखविणाऱ्या चौफुल्यामधील महापुजा बांधण्यात आली. करवीर संस्थान छत्रपती घराण्याकडून जागरानिमित्त जोतिबा पुजेसाठी महावस्त्रेही अर्पण केली.

नवरात्रोत्सवाचा जोतिबा देवाचा जागर इतर देवदैवताच्या आधी साजरा होतो. रविवारी जागरा निमित्त श्री.जोतिबा देवाची चार मुक्तीचे प्रतिक दाखविणाऱ्या चौफुल्या मध्ये महापुजा अमर नवाळे, प्रविण भंडारे, रमेश ठाकरे, नितीन लादे, सरदार सांगळे यांनी बांधली. पुजेपुढे उन्मेष नावाचा अश्व ( घोडा ) अर्पण केला. मंदिराच्या दरवाज्यावर सीताफळ्, कवडांळ . बेल, फुलांचे तोरण बांधली. फलाहाराची पाच ताटाचा नैवेद्य वाजत गाजत यमाई मंदिराकडे नेण्यात आली. उंट, घोडे, वाजंत्री ,देव सेवकाच्या लवाजम्यासह धुपारती सोहळा  निघाला . रात्रभर मंदिर खुले राहणार आहे .पहाटे ३पासुनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. रविवार असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी वाढली. चांगभलंच्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून गेला. तेल, कडाकणी, ऊस अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली.

Web Title: Janasagar was offered to Jyotiba's shrine, Unmesha (horse) was offered to Mahapuja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.