खामकरवाडी पाझर तलाव 'ओव्हर फ्लो'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 PM2021-06-21T16:12:53+5:302021-06-21T16:20:06+5:30

Dam Rain Kolhapur : खामकरवाडी -अवचितवाडी दरम्यान आसलेला खामकरवडी लघूपाठबंधारे प्रकल्प रविवारी मध्यरात्री दहा वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या बाजूच्या सांडव्यातुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.

Khamkarwadi seepage lake 'overflow' | खामकरवाडी पाझर तलाव 'ओव्हर फ्लो'

खामकरवाडी ( ता. राधानगरी) येथील पाठबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असुन,सांडव्यातुन बाहेर पडणाऱ्या पाण्यासह तलावाचे विहंगम दृश्य. ( छाया : श्रीकांत ऱ्हायकर)

googlenewsNext
ठळक मुद्देसांडव्यातुन पाण्याचा विसर्ग पावसाचा जोर ओसरला

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड : खामकरवाडी -अवचितवाडी दरम्यान असलेला खामकरवडी लघूपाठबंधारे प्रकल्प रविवारी मध्यरात्री दहा वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या बाजूच्या सांडव्यातुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी तुळशी नदीपात्रात मिसळल्याने नदी पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर धरणाच्या सांडव्यावरून पडणाऱ्या विहंगम पाण्याचे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी धरणस्थळावर होत आहे.

गेल्या आठ ते दहा दिवसा पासून जिल्हयात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोठया धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. तर तालुक्यातील छोटया -मोठ्या प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे . काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत .जुनच्या पहिल्याच आठवडयापासून पावसाने दमदार एंट्री केल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून रोप लागणीच्या कामाला सुरवात झाली आहे.

खामकरवाडी ( ता. राधानगरी ) येथील अवचितवाडी व खामकरवाडी या दोन गावासाठी वरदान ठरणारा प्रकल्प जुनच्य पंधरवडयात प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे. या अगोदर हा प्रकल्प जुलै अखेर अथवा ऑगस्टमध्ये भरत होता. पण या हा प्रकल्प प्रथमतःच इतक्या लवकर भरल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.

गतसाली हा प्रकल्प लवकरच कोरडा पडल्याने शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तिव्र बनला होता . पण गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू झाल्याने कोरडा पडलेला प्रकल्प रविवारी मध्यरात्री अकरा वाजलेच्या दरम्यान पूर्ण क्षमतेने भरला.

या प्रकल्पात११६२ .७८ सहस्त्र घनमीटर इतका पाणी साठा होत असुन या दोन गावातील लोकांच्या पिण्याचा पाण्यासह शेती सिंचनासाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी वर्गातुन मोठे समाधान व्यक्त होत आहे .

 

Web Title: Khamkarwadi seepage lake 'overflow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.