कोल्हापूर : पालकमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत हृदय शस्त्रक्रियेसाठी कोल्हापुरातून दहा लहान मुले आणि त्यांचे पालक अशा तीस जणांना मुंबईला पाठविण्यात आले.शासनाचा आरोग्य विभाग आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी येथील ‘सीपीआर’मध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात सदोष आढळलेल्या व ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे अशा व या कक्षाशी संपर्क साधून आलेल्या जिल्ह्यातील १० रुग्णांची तिसरी बॅच विशेष वाहनाने मुंबईला रवाना करण्यात आली.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, अॅड. संपत पवार, अॅड. बाबा इंदुलकर, चंद्रकांत घाटगे, श्रीकांत घुंटे, दिलीप मैत्राणी, रुग्ण समन्वयक अनिकेत मोरबाळे, आदी प्रमुख उपस्थित होते.या मुलांवर नवी मुंबई येथील फोर्टिज हॉस्पिटल येथे उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रुग्ण आणि त्यांच्या पालकांची मुंबई येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून रुग्णांच्या आवश्यक तपासण्या होऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी उपचारासाठी पालकमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षांशी संपर्क सावाधा, असे आवाहन कक्षामार्फत करण्यात आले आहे.