कोल्हापूर- अठरा खंडणी बहाद्दरांच्या मुसक्या आवळल्या-- पोलीस अधीक्षक संजय मोहिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 08:36 PM2017-09-25T20:36:19+5:302017-09-25T20:38:29+5:30
कोल्हापूर : छोटे टपरीधारक, हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर्स, दुकानदार, व्यापारी, बिल्डर्स, कारखानदार, आदी व्यावसायिकांकडे खंडणी मागणाºया अठरा बहाद्दरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : छोटे टपरीधारक, हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर्स, दुकानदार, व्यापारी, बिल्डर्स, कारखानदार, आदी व्यावसायिकांकडे खंडणी मागणाºया अठरा बहाद्दरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांत आठ गुन्हे दाखल केले आहेत. नागरिकांनी निर्भयपणे तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सोमवारी केले.
छोटे टपरीधारक, हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर्स, दुकानदार, व्यापारी, बिल्डर्स, कारखानदार, आदी व्यावसायिकांकडे खंडणी मागितली जात आहे. त्यास नकार दिल्यास धमकावून प्रसंगी मारहाणही केली जाते. व्यापार किंवा व्यवसायावर परिणाम होईल, व्यवसायातील पत घसरेल, कुटुंबाच्या जीवितास धोका पोहोचेल, या भीतीने असे व्यावसायिक खंडणी बहाद्दरां विरोधात तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्यामुळेच अशा गुन्हेगारांना फावते आणि ते अशाप्रकारचे गुन्हे वारंवार करतात.
झोपडपट्टीमधील ‘फाळकुटदादा ते व्हाईट कॉलर गुन्हेगार’ खंडणीच्या नावाखाली लाखो रुपये वसूल करतात. हॉटेलमध्ये जेवणानंतर पैसे न देताच उठून जाणे, कापड दुकानांमध्ये फुकटात खरेदी करणे, वाईन शॉपी, बिअर बारमध्येही दादागिरी करणे या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि काही राजकीय लोकांच्या आश्रयामुळे खंडणीखोरांचे धाडस वाढले आहे. यासंबंधी नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी देण्यासंबंधी आवाहन केले होते. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांत तक्रार देण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येत असून आठ गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील अठरा गुन्हेगारांवर कारवाई सुरू असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
खंडणी गुन्'ांची आकडेवारी
शाहूपुरी - २
राजारामपुरी - २
करवीर - १
चंदगड - १
शिवाजीनगर - १
शहापूर - १-