कोल्हापूर : शहरातील कचरा विलगीकरणासह शुल्क देऊन सहकार्य करा, ‘एकटी ’ च्या अनुराधा भोसले चे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:26 PM2018-01-05T14:26:51+5:302018-01-05T14:31:48+5:30
कोल्हापूर शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापना, दुकाने आदींमध्ये होणाऱ्या कचऱ्यांचे वर्गीकरणकृत काम ‘ एकटी ’ करीत आहे. त्यात कचरा विलगीकरण व शुल्क न दिल्यास हे काम सुरु ठेवणे आव्हानात्मक ठरत आहे. तरी या करीता सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
कोल्हापूर : शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापना, दुकाने आदींमध्ये होणाऱ्या कचऱ्यांचे वर्गीकरणकृत काम ‘ एकटी ’ करीत आहे. त्यात कचरा विलगीकरण व शुल्क न दिल्यास हे काम सुरु ठेवणे आव्हानात्मक ठरत आहे. तरी या करीता सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
भोसले म्हणाल्या, कचरा वेचक महीलांना रोजगार व त्यातून पर्यावरणाचे रक्षण या उद्देशाने ‘एकटी ’ संस्था गेल्या तीन वर्षापासून ‘शून्य कचरा व्यवस्थापन ’प्रकल्पावर काम करीत आहे.
यातून प्रभाग क्रमांक ६७ व ६९ या दोन प्रभागात ‘घन कचरा व्यवस्थापन पथदर्शी प्रभाग निर्मिती प्रकल्प राबवित आहे. त्यातून गेल्या वर्षापासून २८४३ कुटूंबाचा रोजचा ओला व सुका कचरा वर्र्गीकरण केला जातो.
यामुळे २३ परिसर विकास भगिनींना रोजगार उपलब्ध आहे. या उपक्रमातून ४०० ते ६०० किलो ओल्या कचऱ्यांचे सेंद्रीय खत निर्माण केले जाते. यातील निरुपयोगी प्लास्टिक महापालिकेने बांधून दिलेल्या सार्टींग शेडमध्ये साठविले जात आहे.
चार महिन्यापुर्वी कोल्हापूर महानगर पालिका व ‘एकटी ’ संस्थेमध्ये २८ एप्रिल २०१६ च्या घन कचरा व्यवस्थापनाच्या कायद्यानुसार शहरातील कचरा व्यवस्थापनाचा करार झाला.
त्यानूसार भाजी मार्केट, केश कर्तनालये, दुकाने, बँका, पतसंस्था, हॉटेल्स व कर्मशियल आस्थापना आदी ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्यांचे वर्गीकरणकृत पद्धतीने संकलन करण्याचेही काम संस्थेमार्फत सुरु करण्यात आले आहे.
६ भाजी मार्केट, ३४ हॉटेल्स, प्रभाग क्रमांक ३२, ३३ येथून कचरा उचलण्यास प्रारंभही केला आहे. मात्र, यातील बहुतांशी आस्थापना , दुकाने, हॉटेल्स, दुकाने सेवा शुल्क देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे संस्थेला मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दररोज १८५ टन कचरा निर्मिती होते. अपुरे मनुष्यबळ, अपुरे साहित्य, वाहतुक साधने, डंम्पिंग ग्राऊड ची सध्याची स्थिती याचा विचार करुन महापालिका स्थायी समितीने हा निर्र्णय घेतला आहे. तरी स्वच्छ कोल्हापूर , सुंदर कोल्हापूर साठी सर्वांनी कचरा विलगीकरणासह शुल्क देऊन सहकार्य करावे.
यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील, समन्वयक मनिषा पोटे, जैनुद्दीन पन्हाळकर, प्रकल्प अधिकारी राहूल संकपाळ, सविता कांबळे, मीरा माने, लक्ष्मी कांबळे, पार्वती कांबळे, आरती चोपडे, सारीका भोर आदी उपस्थित होते.