Kolhapur Flood: कोल्हापुरात सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, पुराच्या पार्श्वभूमीवर निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 05:17 PM2021-07-23T17:17:04+5:302021-07-23T17:18:01+5:30

Kolhapur Flood: कोल्हापुरातील पुराच्या परिस्थितीत येत्या काही काळात वाढ होऊ शकते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल न देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

Kolhapur Flood Ordinary citizens will not get petrol diesel in Kolhapur | Kolhapur Flood: कोल्हापुरात सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, पुराच्या पार्श्वभूमीवर निर्णय 

Kolhapur Flood: कोल्हापुरात सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, पुराच्या पार्श्वभूमीवर निर्णय 

Next

Kolhapur Flood: कोल्हापुरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असून पंचगंगा आणि कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरातील पुराच्या परिस्थितीत येत्या काही काळात वाढ होऊ शकते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल न देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. 

कोल्हापुरात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं आहे. येत्या काही तासांत मुसळधार पाऊस सुरू राहिलं तर रस्ते पूर्णपणे बंद होऊ शकतात. त्यामुळे कोल्हापुरात बाहेरून येणारा पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खंडीत होऊ शकतो. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोल्हापुरात आजपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल आणि डिझेल दिलं जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल दिलं जाणार नाही. यातून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवरही बंधन घालता येईल. 

अत्यावश्यक सेवेतील वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालयातून पास दिले जाणार आहेत. केवळ पास धारकांनाच कोल्हापुरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल उपलब्ध होणार आहे. 

कोल्हापुरात सध्या अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. एनडीआरएफच्या तुकड्या याठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणीत हलविण्याचं काम केलं जात आहे. सलगपणे पडणाऱ्या पाऊसामुळे सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग बंद झाला आहे.उदगाव येथील रेल्वे पुलाजवळील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. ते पाणी सखल भागात शिरल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

Read in English

Web Title: Kolhapur Flood Ordinary citizens will not get petrol diesel in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.