कोल्हापूर : लोकसभा निवडणूक होईपर्यंत आपण कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही; पण माझे ध्येय पक्के आहे, कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या मार्गात बदल होणार नाही. असे सूचक वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केले. कोल्हापूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधातील भूमिकाच बदललेल्या राजकीय वातावरणात त्यांनी स्पष्ट केली.
तपोवन मैदानावर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ‘सतेज कृषी’ प्रदर्शनाबाबत मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या राष्टÑवादी कॉँग्रेस प्रवेशाबाबत विचारले असता, आमदार पाटील म्हणाले, त्याबाबत आमच्या कुटुंबाची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केल्याने त्यावर पुन्हा बोलणे योग्य नाही. राजकारणावर आपण आता काहीच बोलणार नाही, लोकसभा निवडणुकीनंतरच अधिक बोलू. माझे ध्येय पक्के आहे, कोठे पोहोचायचे हे ठरलेले आहे. त्या मार्गात बदल होणार नाही, असे सूचक विधान करत राष्टÑवादी कॉँग्रेसचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार खासदार महाडिक यांच्याशी समेट घडविण्याचा प्रयत्न करणाºया नेत्यांना त्यांनी एकप्रकारे इशाराच दिला.
१ जानेवारीला परिवर्तन अभियानयुवक कॉँग्रेसच्या वतीने १ जानेवारीला दक्षिण विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अभियान सुरू केले जाणार आहे. त्यावेळी संपूर्ण मतदारसंघात फिरणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
म्हणून ‘नवऊर्जा’ला भेटनवऊर्जा महोत्सवाला गेल्या वर्षीही निमंत्रण होते; पण बाहेरगावी असल्याने जाऊ शकलो नाही. चांगल्या कार्यक्रमांत जाणे-येणे असले पाहिजे, राजकीय मतभेद ज्या-त्या ठिकाणी ठेवावेत. नवऊर्जा महोत्सवातून ऊर्जा घेतली, आता कृषी प्रदर्शनातून प्रेरणा घेणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
मुदतीनंतर जिल्हा परिषदेचा सारीपाटताराराणी आघाडीचे गडहिंग्लजचे सभापती विजयराव पाटील हे आमच्या सोबत आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता बदलासाठी आताच प्रयत्न करणार नाही; पण पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर तिथेही सारीपाट मांडू, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.