कोल्हापूर : मालिका आणि चित्रपटांपेक्षा नाटकांमध्ये जिवंतपणा : गिरीष ओक, कलायात्री पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:18 PM2018-03-02T13:18:18+5:302018-03-02T13:18:18+5:30

नाटक, मालिका आणि चित्रपट ही तीनही माध्यमे अभिनयासाठी आव्हानात्मक असली तरी नाटकामध्ये जिवंतपणा असतो. रिप्लेसमेंट म्हणून काम करताना अवहेलना पचवली पण नाटक सोडल नाही या अपमानातूनच मला लढण्याची ताकद मिळाली असे मनोगत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीष ओक यांनी व्यक्त केले.

Kolhapur: Life and drama among serials and films: Girish Oak, Kalayatri Puraskar | कोल्हापूर : मालिका आणि चित्रपटांपेक्षा नाटकांमध्ये जिवंतपणा : गिरीष ओक, कलायात्री पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : मालिका आणि चित्रपटांपेक्षा नाटकांमध्ये जिवंतपणा : गिरीष ओक, कलायात्री पुरस्कार प्रदान

Next
ठळक मुद्देगिरीश ओक यांनी सादर केले तो मी नव्हेच ' नाटकातील स्वगतकपाले यांच्या हस्ते नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : नाटक, मालिका आणि चित्रपट ही तीनही माध्यमे अभिनयासाठी आव्हानात्मक असली तरी नाटकामध्ये जिवंतपणा असतो. नाटक आपल्याला प्रत्यक्ष व्यक्तीच्या सादरीकरणातून भावभावनांचे अनुभव देवून जाते. डॉक्टरकीचे शिक्षण घेतले असले तरी मी त्यात स्थिरावलो नव्हतो. नाटक आवडायचे म्हणून नशीब आजमवायला मुंबईत आलो. रिप्लेसमेंट म्हणून काम करताना अवहेलना पचवली पण नाटक सोडल नाही या अपमानातूनच मला लढण्याची ताकद मिळाली असे मनोगत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीष ओक यांनी व्यक्त केले.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात गुरूवारी डॉ. गिरीष ओक यांना अथौपेडिक सर्जन जिनेश्वर कपाले यांच्या हस्ते नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी झालेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी आपला अभिनय प्रवास उलगडला. कमला कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. सुजय पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत हा संवाद सुरेख खुलवला.

डॉ. ओक म्हणाले, जयशंकर दानवे हे मोठे कलाकार होते. माज्या दीपस्तंभ या नाटकातील भूमिका दानवे यांच्या खलनायकी अभिनयाची आठवण करून देते. दिपस्तंभ ते वेलकम जिंदगी या रंगभूमीवरील प्रवासाबाबत ते म्हणाले, प्रभाकर पणशीकरांच्या ' तो मी नव्हेच ' नाटकात एक भूमिका रिप्लेसमेंट म्हणून मिळाली. पणशीकर या एकमेव व्यक्तीने माझ्या अभिनयाला जोखले आणि त्यांच्यानंतर ते नाटक माझ्याकडे आले .

सध्याच्या युगात फसवण्याची साधन आणि काही थोडे बदल करुन हे नाटक आजही प्रेक्षक पसंतीस उतरत आहे . यानंतर यू टर्न, ती फुलराणी, कुसुम मनोहर लेले, वेलकम जिंदगी अशी कित्येक नाटके मी केली. एखाद्या भूमिकेशी तुलना झाली की मला त्रास होतो . त्यामुळे ती फुलराणी या नाटकातून मला मानसीक समाधान मिळू शकले नाही. यानंतर काही चित्रपट, मालिका केल्या. लेखनही सुरु होते.

मुलाखतीनंतर गिरीश ओक यांनी तो मी नव्हेच ' नाटकातील स्वगत सादर केले. जयश्री दानवे यांनी प्रास्ताविक केले. अनुपमा चव्हाण यांनी मानपत्र वाचन केले. ऐश्वर्या बेहरे यांनी सूत्रसंचलन केले. राजदर्शन दानवे यांनी आभार मानले. यावेळी सुधीर पेटकर, चंद्रकांत जोशी, यशवंत भालकर, दिलीप बापट, श्रीकांत डिग्रजकर उपस्थित होते .

 

 

Web Title: Kolhapur: Life and drama among serials and films: Girish Oak, Kalayatri Puraskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.