Lokmat Kolhapur Maha Marathon 2018 : ‘बीब ’ कलेक्शन एक्स्पोला ‘ नाद खुळा ’ प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 03:58 PM2018-02-17T15:58:48+5:302018-02-17T18:31:23+5:30
राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेत हजारो कोल्हापूरकरासह राज्यातील हजारो धावपटू सहभागी झाले आहेत.सर्व धावपटूंसाठी बीब कलेक्शन तसेच मार्गदर्शन एक्स्पोचे शनिवारी पोलीस ग्राउंड, अलंकार हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. त्यास सहभागी स्पर्धकांनी महा प्रतिसाद देत एक्स्पोचा लाभ घेतला.
कोल्हापूर : राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेत हजारो कोल्हापूरकरासह राज्यातील हजारो धावपटू सहभागी झाले आहेत.सर्व धावपटूंसाठी बीब कलेक्शन तसेच मार्गदर्शन एक्स्पोचे शनिवारी पोलीस ग्राउंड, अलंकार हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. त्यास सहभागी स्पर्धकांनी महा प्रतिसाद देत एक्स्पोचा लाभ घेतला. कोल्हापूरातील सर्वात चांगले आणि नीटनेटके आयोजन अशी सर्वांनी दाद दिली.
सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या बीब वितरण कार्यक्रमात धावपटूंना किट देण्यात आली. याशिवाय आरोग्य तपासणी, व्यायाम, आहार आदींविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सोबतीला रॉक बँड संगीताची मेजवानी सादर करण्यात आली.
एक्स्पोचे उदघाटन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, राजुरी स्टीलचे कपिल दुधाळे,कोल्हापूर स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण, सचिव उदय पाटील, रिलॅक्स झेल चे संजय पाटील, लोकमत चे कार्यकारी संचालक करण दर्डा, महामॅरेथॉनच्या संयोजिका रुचिरा दर्डा, लोकमतचे संपादक वसंत भोसले, लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, डॉ. प्रांजली धमाणे, आहारतज्ज्ञ डॉ. प्राची कर्नावट आदी मान्यवर उपस्थित होते.