कोल्हापूर : वृध्देचे साडेतीन तोळ्याचे गंठण लंपास, राजेंद्रनगर रिंगरोडवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 03:09 PM2018-03-02T15:09:52+5:302018-03-02T15:09:52+5:30

राजेंद्रनगर रिंगरोड येथे भजनाला निघालेल्या वृध्देच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केले. गुरुवारी (दि. १) भरदिवसा चारच्या सुमारास ही घटना घडली. पोलीसांनी नाकाबंदी करुन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतू ते मिळून आले नाहीत.

Kolhapur: Lund, three-tenth bulk of old age, incident on the ring road | कोल्हापूर : वृध्देचे साडेतीन तोळ्याचे गंठण लंपास, राजेंद्रनगर रिंगरोडवरील घटना

कोल्हापूर : वृध्देचे साडेतीन तोळ्याचे गंठण लंपास, राजेंद्रनगर रिंगरोडवरील घटना

Next
ठळक मुद्देवृध्देचे साडेतीन तोळ्याचे गंठण लंपासराजेंद्रनगर रिंगरोडवरील घटना

कोल्हापूर : राजेंद्रनगर रिंगरोड येथे भजनाला निघालेल्या वृध्देच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केले. गुरुवारी (दि. १) भरदिवसा चारच्या सुमारास ही घटना घडली. पोलीसांनी नाकाबंदी करुन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतू ते मिळून आले नाहीत.

अधिक माहिती अशी, कमल यशवंत वासुदेव (वय ६९, रिंगरोड, राजेंद्रनगर) ह्या गुरुवारी ओळखीच्या महिलांसोबत सम्राटनगर बीएसएनएल आॅफिसजवळ राहणारे हसबनीस यांचे घरी भजनाच्या कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या.

यावेळी राम मंगल कार्यालयासमोर पाठिमागुन दूचाकीवरुन दोन तरुण आले. पाठिमागे लांब केसाच्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारुन काढून घेतले. त्यानंतर धूम स्टाईलने ते पसार झाले.

अचानक घडलेल्या प्रकाराने कमल वासुदेव ह्या बिथरुन गेल्या. त्यांच्या सोबत असलेल्या महिलांनी चोर..चोर म्हणून आरडाओरड केली. परंतू आजूबाजूला कोणी नागरिक नसलेने चोरटे पसार झाले.

नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा माग पोलीस काढत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोहार करीत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: Lund, three-tenth bulk of old age, incident on the ring road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.