कोल्हापूर : शाहूपुरीत ‘मसाज’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय, अड्डामालकिणीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 04:41 PM2018-03-17T16:41:14+5:302018-03-17T16:41:14+5:30
‘मसाज’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या शाहूपुरी, पाच बंगला येथील मंजुळा इमारतीमधील ‘गुलमोहर फिटनेस सेंटर’ या मसाज सेंटरवर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी (दि. १६) दुपारी छापा टाकला. या सेंटरच्या महिला मालकिणीला अटक केली. संशयित प्रिया विनायक यादव (वय २७, रा. पुईखडी, शिव पार्वती हौसिंग सोसायटी, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. तिच्या ताब्यातून स्थानिक पीडित दोन महिलांची सुटका केली.
कोल्हापूर : ‘मसाज’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या शाहूपुरी, पाच बंगला येथील मंजुळा इमारतीमधील ‘गुलमोहर फिटनेस सेंटर’ या मसाज सेंटरवर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी (दि. १६) दुपारी छापा टाकला. या सेंटरच्या महिला मालकिणीला अटक केली. संशयित प्रिया विनायक यादव (वय २७, रा. पुईखडी, शिव पार्वती हौसिंग सोसायटी, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. तिच्या ताब्यातून स्थानिक पीडित दोन महिलांची सुटका केली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, शाहूपुरी, पाच बंगला-बागल चौक परिसरातील इंडिया पार्क, मंजुळा इमारतीमधील ‘गुलमोहर फिटनेस सेंटर’ या मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडील वाचक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांना मिळाली होती.
त्यानुसार ते शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास करवीर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक आरती नांद्रेकर यांच्यासह सहकाऱ्यांना घेऊन कारवाईसाठी रवाना झाले. बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री करून घेतली. त्यानंतर छापा टाकला असता कुंटणखाना चालविला जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी अड्डा मालकीण प्रिया यादवसह स्थानिक दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची कबुली दिली.
आरती नांद्रेकर यांनी स्वत: फिर्याद देऊन अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलमानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पीडित महिला ह्या स्थानिक असून, त्यांची परिस्थिती गरिबीची आहे. संशयित प्रिया यादव ही मसाज सेंटरच्या नावाखाली या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असे.
दुसऱ्यांदा कारवाई
याच मसाज सेंटरमध्ये दि. २६ मार्च २०१७ ला तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी छापा टाकून कारवाई केली होती. यावेळी अड्डा मालकीण अनुराधा बाळासाहेब देशमुख (वय ३०, रा. कणेरेवाडी, ता. करवीर), शिल्पा अमितकुमार देशमुख (३१, रा. गुलमोहर कॉलनी, आर. के. नगर) या दोघींसह एका पीडित तरुणीला ताब्यात घेतले होते. कारवाईनंतर दोन महिने मसाज सेंटर बंद राहिले. त्यानंतर प्रिया यादव हिने सुरू केले. या सेंटरचा शाहूपुरी पोलिसांना महिना हप्ता जात असल्याची चर्चा नागरिकांत आहे.