कोल्हापूर : लोकमत महामॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी हजारो धावपटू जोरदार सराव करीत आहेत. मैदानासह विविध मार्गांवर घाम गाळत आहेत. तेवढ्याच जोशात ते रविवारी (दि. ६) धावणार आहेत. काही कारणांस्तव तुम्ही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ शकला नाहीत, तरी तुम्हीही मॅरेथॉनच्या मार्गावर दुतर्फा उभे राहून या धावपटूंना प्रोत्साहन देऊ शकता. तुमचे अस्तित्व स्पर्धकांचे मनोबल वाढविण्यास कारणीभूत ठरणार आहे.
आपले योगदान असे द्या१) महामॅरेथॉनच्या मार्गावर उभे राहून तुम्ही धावणाऱ्यांचा उत्साह वाढवू शकता. तुम्ही टाळ्या वाजवून केलेल्या स्वागतामुळे त्यांच्यामध्ये दुप्पट वेगाने धावण्याची ऊर्जा निर्माण होईल. तसेच त्यांना तुम्ही पाणीही देऊ शकता.२) मॅरेथॉन मार्गावर ढोल-ताशा, गाणे, संगीत वाजवून किंवा लेझीम खेळून जल्लोषपूर्ण वातावरण तयार करू शकता. अशा वातावरणामुळे धावपटू्ंना आपले उद्दिष्ट गाठण्यात मदत होईल. या निमित्ताने बाहेरून येणाऱ्या धावपटूंना कोल्हापूर कला व क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देणारी नगरी असल्याची अनुभती देऊ शकता.३) महामॅरेथॉनमधील नामांकित धावपटूंना बघून शाळकरी मुलांना मोठी प्रेरणा मिळू शकते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या नगरीतील विद्यार्थीही धावपटू बनू शकतील. यासाठी शाळकरी मुलामुलींनी मॅरेथॉन मार्गावर उभे राहून धावपटूंचे मनोबल वाढवावे. कुटुंबासह मित्रमंडळींनाही आणा आणि सहभागी व्हा. ही एक आरोग्यासाठी धावण्याची मोठी चळवळ आहे.
उद्या पोलीस ग्राऊंडवर ‘बीब कलेक्शन एक्स्पो’‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसºया पर्वामध्ये सहभागी झालेल्या सर्वांसाठी उद्या, शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत पोलीस ग्राऊंडनजीकच्या अलंकार हॉल येथे ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ आयोजित केला आहे. या एक्स्पोचे उद्घाटन शाहू छत्रपती यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यात टी-शर्ट आणि बीब (चेस्ट नंबर), गुडी बॅग वाटप केली जाणार आहे.ज्या स्पर्धकांनी महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी केलेली आहे, त्यांना मोबाईलवर आलेले एसएमएस, ई-मेल्स किंवा सभासद नोंदणी शुल्काची पावती सोबत आणावी लागणार आहे. सोबत आयडेंटिटी फोटो असावा. जे स्पर्धक स्वत: येऊन हे साहित्य घेऊ शकणार नाहीत, त्यांनी मित्र, नातेवाइकांकडे आॅथॉरिटी लेटर, रिसिट, ई-मेल्स पाठवून द्यावे; तर ते साहित्य त्यांना देण्यात येईल.
दरम्यान, या एक्स्पोमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंची शनिवारी वैद्यकीय तपासणी होणार आहे. त्यात रक्तदाब, शुगर, उंची व वजन तपासणी केली जाणार आहे. त्यासह तज्ज्ञांद्वारे आहार व मानसोपचार, आदींवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
असा होणार ‘बीब एक्स्पो’* सकाळी १० वा. : प्रमुख उपस्थितांच्या हस्ते ‘बीब कलेक्शन एक्स्पो’चे उद्घाटन, गणेशवंदना.* दुपारी १२ वाजता : फिजिओथेरपिस्ट प्रांजली धामणे यांचे मार्गदर्शन* दुपारी १२.३० वाजता : आयर्नमॅन चेतन चव्हाण यांचे मार्गदर्शन* दुपारी १ ते ४ : मनोरंजनाचा कार्यक्रम* सायंकाळी ५ वा. : महामॅरेथॉनचा मार्ग आणि त्यावरील सोईसुविधांची माहिती* सायंकाळी ५.३० वा. : स्पर्धेत सहभागी झालेले आयर्नमॅन यांच्याशी संवाद* सायंकाळी ६ वा. : स्पर्धेत सहभागी असणाऱ्या ‘पेसर’ यांचा परिचय* सायंकाळी ६.३० वा. : रविवारी (दि. ६) होणाऱ्यां महामॅरेथॉनच्या वेळापत्रकाची माहिती.
यासाठी ‘बीब’ महत्त्वाचा...‘बीब’ म्हणजे धावपटू छातीवर लावतात तो कापडी फलक. कोणत्याही शर्यतीचा ‘बीब’ हा आत्मा समजला जातो. धावपटूंना ओळखण्यासाठी या बीब क्रमांकाचा उपयोग करण्यात येतो.
‘लोकमत’ने महामॅरेथॉनच्या रूपाने ‘धावा आरोग्यासाठी’ अर्थात मैदानी स्पर्धांना प्रोत्साहन देऊन एक प्रकारे क्रीडानगरीतील प्रत्येकाच्या आरोग्यासाठी नवसंजीवनी देणारा मंत्रच जणू दिला आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. जे सहभागी झालेले नाहीत, त्यांनीही धावपटूंना चीअर अप करण्यासाठी मॅरेथॉन मार्गांच्या दुतर्फा उभे राहून प्रोत्साहन द्यावे.- बंटी सावंत, आरोग्यमित्र