कोल्हापूर : राज्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारूशीला चौधरी यांच्याकडे करण्यात आली.यावेळी निवेदनातील सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. चर्चेमध्ये थकीत वेतन, कॅशलेस आरोग्य योजना, शंभर टक्के मेडिकल बिल प्रतिपूर्ती, १५० पटावरील शाळांना पात्र मुख्याध्यापक, विद्यार्थिसंख्येनुसार संचमान्यतेमध्ये जादा शिक्षक मिळावेत, संचमान्यता दुरुस्ती, शिक्षक भरती, इत्यादींसह अन्य सर्व विषयावर सविस्तर चर्चा झाली.
निवेदनातील सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागास कार्यवाही करण्याचे आदेश दिले जातील, असे आश्वासन चौधरी यांनी दिले. यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे व पुरोगामी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष विलास पिंगळे, इत्यादी उपस्थित होते.