शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM वरून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावले; म्हणाले, “पराभूत झाल्यावर आता...”
2
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस-पवार दिल्ली दौऱ्यावर, शिंदेना गृहमंत्रालय मिळणार की नाही?
3
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखडा यांच्यावर निशाणा
4
परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड; आंदोलन पुन्हा चिघळल्याने जमावबंदीचे आदेश 
5
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
6
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
7
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'
8
कोण आहेत सिरियाचे नवे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर? मार्च २०२५ पर्यंत पदावर राहणार, जाणून घ्या...
9
'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा ... तुमच्या व्हॉट्सॲप स्टोरेजचे टेन्शन होईल दूर!
10
परभणीत आंदोलन चिघळले, सुप्रिया सुळेंकडून निषेध व्यक्त; कठोर कारवाईची केली मागणी
11
मोठा निष्काळजीपणा! रुग्णालयात १० वर्षीय मुलाला 'O' पॉझिटिव्ह ऐवजी दिलं 'AB+' रक्त अन्...
12
Bobby Deol : "माझ्यामुळे कुटुंबाने कठीण काळ पाहिला" म्हणत बॉबी झाला भावुक; सनी देओलने पुसले अश्रू
13
२०० प्लस टार्गेट! फिफ्टी हुकली; पण Prithvi Shaw च्या भात्यातून आली 'एकदम कडक' खेळी
14
राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय?
15
"बांगलादेश ऐकत नसेल तर हिंदूंच्या रक्षणासाठी...!" RSS चं मोदी सरकारला आवाहन
16
“...तर त्याचे परिणाम भोगावे लागतील”; परभणीत आंदोलन चिघळले, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
17
“‘हे’ ३ मुद्दे भाजपाला खूपच अस्वस्थ करतात, EVMबाबत सुप्रीम कोर्टात जाणार”: प्रणिती शिंदे
18
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी शिंदेंच्या शिलेदाराकडून काढली; फडणवीसांकडून नवी नियुक्ती
19
फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा झाला नाही; न्यायालयाने ठोठावला १५ लाखांचा दंड, ७९ रुपयांची होती खरेदी
20
SMAT 2024, BRD vs BEN : भावाच्या कॅप्टन्सीत हार्दिकनं दाखवली गोलंदाजीतील ताकद; मग संघाला मिळालं सेमीचं तिकीट

कोल्हापूर, सातारा पाेलिसांना सर्वसाधारण विजेतेपद, ५० व्या परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2024 1:37 PM

कदमवाडी ( कोल्हापूर ) : शहीद अशोक कामटे साहेब क्रीडानगरीत सुरू असलेल्या परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत पुरुष गटाचे सर्वसाधारण ...

कदमवाडी (कोल्हापूर) : शहीद अशोक कामटे साहेब क्रीडानगरीत सुरू असलेल्या परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत पुरुष गटाचे सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर व सातारा संघाला विभागून देण्यात आले, तर महिलांचे सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर संघाने पटकाविले.गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर पोलिस परेड मैदानावरील शहीद अशोक कामटे साहेब क्रीडानगरीत सुरू असलेल्या ५०व्या परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेचा बुधवारी समारोप झाला. या स्पर्धेत कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर शहर व ग्रामीण आणि पुणे ग्रामीण असे सहा पोलिस संघ दाखल झाले होते. या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी कोल्हापूर व सातारा पोलिस संघांत अटीतटीची लढत सुरू होती. एकूण स्पर्धेत पुरुष गटाचे गुण समसमान झाल्याने पुरुष गटाचे सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर व सातारा संघाला विभागून दिले.

बुधवारी स्पर्धेच्या अंतिम दिवशी विजेत्या संघास पारितोषिक वितरण पुणे विभागीय आयुक्त डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते झाले, तर प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, सोलापूर शहरचे पोलिस आयुक्त एस.राजकुमार, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, साताराचे पोलिस अधीक्षक समीर शेख, पुणे ग्रामीणचे पंकज देशमुख व सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, क्रीडानगरी कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांनी कुस्ती रुजवली व नावलौकिकास आणली. खाशाबा जाधव, स्वप्निल कुसाळे यांच्यासारखे ऑलिम्पिकवीर पोलिस दलातून निर्माण व्हावेत, तर सुनील फुलारी यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुका या भयमुक्त वातावरणात आणि शांततेत पार पाडण्याबरोबरच बंदोबस्त व नोकरी सांभाळून मिळविलेल्या यशाबद्दल सर्व पोलिस खेळाडूंचे अभिनंदन केले.

ही स्पर्धा पार पाडण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपअधीक्षक पद्मा कदम, सुवर्णा पत्की, राखीव पोलिस निरीक्षक राजकुमार माने, नंदकुमार मोरे, संतोष डोके व क्रीडा विभागप्रमुख बाबासो दुकाने, धनंजय परब यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी, तर आभार अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी मानले.

बेस्ट ॲथलॅटिक्स पुरुषअमृत तिवले, कोल्हापूरबेस्ट ॲथलॅटिक्स महिलासोनाली देसाई.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरSangliसांगलीPoliceपोलिस