कोल्हापूर : ‘दुकाने व आस्थापना ’ अधिनियम लागू, राज्य शासनाच्या निर्णयाचे व्यापारी वर्गाकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 04:10 PM2017-12-20T16:10:57+5:302017-12-20T16:14:03+5:30
राज्यात बुधवारपासून ‘दुकाने व आस्थापना’ लागू करण्यात आला. यात सातही दिवस दुकाने आणि आस्थापना सुरु ठेवण्याची मुभा असणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कोल्हापूरातील सर्वच क्षेत्रातील व्यापारी वर्गाकडून स्वागत करण्यात आले. आजच्या काळात माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत्या स्वरुपामुळे २४ बा ७ असे प्रत्येक क्षेत्रात स्वरुप आले आहे. आॅनलाईनमुळे व्यवसाय २४ तास सुरु असतात. त्यामुळे आॅफलाईन दुकानानाही त्याचा फायदा व्हावा.
कोल्हापूर : राज्यात बुधवारपासून ‘दुकाने व आस्थापना’ लागू करण्यात आला. यात सातही दिवस दुकाने आणि आस्थापना सुरु ठेवण्याची मुभा असणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कोल्हापूरातील सर्वच क्षेत्रातील व्यापारी वर्गाकडून स्वागत करण्यात आले.
आजच्या काळात माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत्या स्वरुपामुळे २४ बा ७ असे प्रत्येक क्षेत्रात स्वरुप आले आहे. आॅनलाईनमुळे व्यवसाय २४ तास सुरु असतात. त्यामुळे आॅफलाईन दुकानानाही त्याचा फायदा व्हावा.
या उद्देशाने राज्य शासनाने दुकाने व आस्थापनाही आठवड्यातील सातही दिवस सुरु राहण्यास मुभा दिली. त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी या निर्णयाचा फायदा होणार आहे. विशेषत: मॉल, किरकोळ दुकाने, औषध दुकाने, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने , आदींना त्याचा फायदा होईल. या निर्णयाचे स्वागत कोल्हापूरातील व्यापारी वर्गानेही स्वागत केले आहे.
यासह ९ पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व कारखाना यांना गुमास्ता परवाना घ्यावा लागत होता. तो आता घ्यावा लागणार नाही. त्यामुळे छोट्या व्यापाºयांनाही आता एक किंवा दोन कामगार असले तरी त्याची गुमास्ताकडे नोंदणी करावी लागणार नाही. या निर्णयाचेही स्वागत करण्यात आले.
मुळातच औषध दुकानाना याचा फायदा होणार आहे. अधिकृतरित्या राज्य शासनानेच शिक्कामोर्तब केल्याने दुकानदार सुरक्षित झाले. छोट्या घाऊक औषध दुकानदारांनाही गुमास्ता कायद्यातही दुरुस्ती केल्याने फायदा होणार आहे. राज्य शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. परवान्याबाबतच्या कटकटी यातून मिटणार आहेत.
- मदन पाटील,
कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन
राज्य शासनाच्या सात दिवस दुकाने उघडी ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण धान्य व्यापारी वर्गात मुळातच मंदीचे दिवस सुरु आहेत. त्यात सात दिवस दुकाने उघडी ठेवणे परवडण्यासारखे नाही. गुमास्ता कायद्यात बदल करुन सरकारने व्यापाºयांना एक प्रकारे दिलासाच दिला आहे.
वैभव सावर्डेकर,
धान्य व्यापारी,
परदेशाप्रमाणे आपल्याकडेही राज्य शासनाने अशा प्रकारे निर्णय घेऊन व्यापारी, उद्योजकांना एक प्रकारे दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे या क्षेत्राला निश्चितच फायदा होणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे.
- बाबासाो कोंडेकर,
अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरीग असोसिएशन