कोल्हापूर : जीम स्विमींग अकादमी(कोल्हापूर) व दुर्गामाता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्गतर्फे घेण्यात आलेल्या सागरी जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी करीत यश मिळवले.विजयदुर्ग बंदर खाडी येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यासह कर्नाटक, गोवा येथील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ११० स्पर्धकांनी सहभाग घेतला.स्पर्धेचा निकाल असा- आठ वर्षांखालील मुले- इशान राव (नाशिक), श्रीधर कामते, सोहम हळदकर (कोल्हापूर), मुलींमध्ये आयुषी आखाडे (ठाणे), आसावरी मोरे , रुद्र खाडे (कोल्हापूर).चौदा वर्षांखालील मुलांमध्ये पार्थ प्रशांत काटे (कोल्हापूर), स्मरण मंगलोरकर (बेळगाव), तनिष्क आयरे (कोल्हापूर), तर मुलींमध्ये कृष्णा शेळके, अपूर्वा म्हेत्रे (कोल्हापूर), स्नेहा रंजन नार्वेकर (सिंधुदुर्ग).
१७ वर्षांखालील मुलांमध्ये विनय कदम (सातारा), भाग्येश महेश पालव (सिंधुदुर्ग), ऋषिकेश कमलाकर पाटील (कोल्हापूर). मुलींमध्ये मानसी नरेंद्र श्रींगारे (कोल्हापूर), योगेश्वरी महादेव कदम (सांगली).खुला गट (१७ वर्षावरील)- मुलांमध्ये पृथ्वीराज प्रभाकर डांगे, ओंकार चंद्रकांत भुुर्इंगडे (कोल्हापूर), स्वप्निल संजय गोडसे (सातारा), तर मुलींमध्ये सुबिया मुल्लानी, अस्मिता अमर म्हाकवे , भक्ती गणेश पाटील (सर्व कोल्हापूर).
एकेचाळीस वर्षांवरील (मास्टर गट) पुरुष- प्रकाश पांडुरंग वराडकर (सिंधुदुर्ग), गगन देशमुख, प्रकाश किल्लेदार (कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
स्पर्धेसाठी पंच म्हणून अजय पाठक, निळकंठ आखाडे, रवी राणे, सुधीर चोरगे, संदीप पाटील, गंगाराम बरगे यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर व उपाध्यक्ष आनंद माने यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद देवधर व राज्य संघटनेचे स्पर्धा निरीक्षक व सहसचिव घनश्याम कुंवर यांच्या हस्ते करण्यात आला.