कोल्हापूर :  भाजी विक्रेत्यांकडे खंडणीची मागणी, तिघा फाळकुटदादांना अटक : शाहुपूरी पाच बंगला परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:48 PM2018-01-05T14:48:26+5:302018-01-05T14:51:50+5:30

शाहुपूरी पाच बंगला भाजी मंडई येथील भाजी विक्रेत्या महिलेकडे खंडणी मागणाऱ्या तिघा फाळकुटदादांना शाहुपूरी पोलीसांनी गुरुवारी अटक केली. संशयित विलास जोगेश शहा (वय २८), लखन जोगेश नायडु (२७, दोघे रा. पाच बंगला परिसर), मिरासाहब चाँदसाहब सय्यद (४२, रा. मालगाव रोड, खोतनगर, मिरज, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत.

Kolhapur: Three businessmen arrested for demanding ransom from shopkeepers, incident in Shahupuri five bungalows | कोल्हापूर :  भाजी विक्रेत्यांकडे खंडणीची मागणी, तिघा फाळकुटदादांना अटक : शाहुपूरी पाच बंगला परिसरातील घटना

कोल्हापूर :  भाजी विक्रेत्यांकडे खंडणीची मागणी, तिघा फाळकुटदादांना अटक : शाहुपूरी पाच बंगला परिसरातील घटना

Next
ठळक मुद्दे शाहुपूरी पाच बंगला परिसरातील घटनाभाजी विक्रेत्यांकडे खंडणीची मागणीतिघा फाळकुटदादांना अटक, तिघेही सराईत गुन्हेगार

कोल्हापूर : शाहुपूरी पाच बंगला भाजी मंडई येथील भाजी विक्रेत्या महिलेकडे खंडणी मागणाऱ्या तिघा फाळकुटदादांना शाहुपूरी पोलीसांनी गुरुवारी अटक केली. संशयित विलास जोगेश शहा (वय २८), लखन जोगेश नायडु (२७, दोघे रा. पाच बंगला परिसर), मिरासाहब चाँदसाहब सय्यद (४२, रा. मालगाव रोड, खोतनगर, मिरज, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, पार्वती प्रकाश शहा (४०, रा. शाहु कॉलेजसमोर, सदर बझार) यांचा पाच बंगला परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. चार महिन्यापासून संशयित विलास शहा, लखन नायडु व मिरासाहब सय्यद हे त्यांचेकडून हप्ता वसुली करतात. येथील अन्य भाजी विक्रेत्यांकडूनही हप्ता वसुल करतात.

गुरुवारी (दि. ४) रोजी पुन्हा तिघेजण भाजी स्टॉलवर आले. त्यांनी हप्त्याची मागणी केली असता त्यास नकार दिला. यावेळी हा आमचा इलाका आहे, भाजी विकायची असेल तर हप्ता दिला पाहिजे असे दमदाटी केली. शहा यांना तेथून हिसकावुन लावले.

यावेळी अन्य भाजी विक्रेत्या हिना इरफान नालबंद (रा. उचगाव) यांनी मध्यस्थी करताच ठार मारण्याची धमकी दिली. शहा यांच्या फिर्यादीनुसार पोलीसांनी या तिघांना अटक केली. तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. लखन नायडु याचेवर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव करीत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: Three businessmen arrested for demanding ransom from shopkeepers, incident in Shahupuri five bungalows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.