कोल्हापूर : मिरजकर तिकटी येथील ओेंकारेश्वर मंदिरात त्रिशुल हलले ; अफवेने नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:31 PM2017-12-18T15:31:52+5:302017-12-18T15:40:23+5:30

कोल्हापूर येथील मिरजकर येथील तिकटी विठ्ठल मंदिर शेजारील औंकारेश्वर मंदीरातील त्रिशूल अापोअाप हलत असल्याच्या अफवेने मंदीरात नागरिकांनी केली होती. भक्तांना सोमवारी दूपारी प्रकार दिसून आला. ही माहिती सोशल मिडियावरुन व्हॉयरल होताच नागरिकांनी ते पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. अनेक भक्तांनी तर त्रिशुलचे व्हीडीओ शुटिंग यावेळी केले. 

Kolhapur: Trishul hangs at the Omkareshwar temple at Mirajkar Tiki; Crowds of citizens | कोल्हापूर : मिरजकर तिकटी येथील ओेंकारेश्वर मंदिरात त्रिशुल हलले ; अफवेने नागरिकांची गर्दी

कोल्हापूरातील मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरशेजारील ओंकारेश्र्वर मंदिरात त्रिशुल हलत असल्याची माहिती सोमवारी दूपारी सोशल मिडियावरुन व्हायरल होताच नागरिकांनी ते पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. (छाया : दीपक जाधव)

googlenewsNext
ठळक मुद्देओंकारेश्र्वर मंदिरात त्रिशुल हलत असल्याची अफवा माहिती सोशल मिडियावरुन व्हायरलत्रिशुल पाहण्यासाठी मंदिरात नागरिकांनी केली गर्दी

कोल्हापूर : येथील मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिर शेजारील औंकारेश्वर मंदीरातील त्रिशूल अापोअाप हलत असल्याच्या अफवेने मंदिरात नागरिकांनी केली होती.

 मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर शेजारील असलेल्या ओंकारेश्र्वर मंदिरातील त्रिशुल हललेचा प्रकार भक्तांना सोमवारी दूपारी दिसून आला. ही माहिती सोशल मिडियावरुन व्हायरल होताच नागरिकांनी ते पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. अनेक भक्तांनी तर त्रिशुलचे व्हीडीओ शुटिंग यावेळी केले. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, प्राचीन ओंकारेश्वर मंदिर आहे .रोज या मंदिरात शंकर भक्त येतात. सोमवारी दूपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन भक्त मंदिरात दर्शनासाठी गेले.

पिंडी शेजारी उभा केलेले त्रिशुल त्यांना चक्क हलल्याचे दिसले. अचानक त्रिशुल हलल्यामुळे त्यांनाही काही हा प्रकार पहिल्यांदा समजेना. त्यांनी त्रिशुलचे दर्शन घेतले व ते बाहेर आले. हा मंदिरातील प्रकार इतरांना सांगितला. बघता-बघता मंदिरात त्रिशुल पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली. मंदिराजवळील असलेल्या शाळेतील शिक्षक ही हे त्रिशुल पाहण्यासाठी आले.

सोशल मिडियावरुन ही माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. मंदिरात प्रत्येकजण काय झाले,अशी विचारणा करत याठिकाणी आले. त्यांनी मंदिरात जाऊन पाहिले तर किंचित त्रिशुल हलत असल्याचे दिसल्याचे यावेळी सांगितले.त्रिशुल पाहण्यासाठी मंदिराकडे दूपारी नागरिकांनी गर्दी केली होती.

 

Web Title: Kolhapur: Trishul hangs at the Omkareshwar temple at Mirajkar Tiki; Crowds of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.