कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. पोस्टल मतांची मोजणी काही ठिकाणी पुर्ण होवून आता ईव्हीएम मशिनची आकडेवारी हाती आली आहे. सुरुवातीच्या कलानुसार राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी आघाडी घेतली आहे. तर कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी आघाडी घेतली आहे.राधानगरीतून शिंदेसेनेचे प्रकाश आबिटकर, इचलकरंजीमधून भाजपचे राहुल आवाडे, कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक, शिरोळमधून अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर, शाहूवाडी जनस्वराज्य पक्षाचे विनय कोरे, करवीरमधून काँग्रेसचे राहुल पाटील आघाडीवर आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीची आकडेवारी समोर येवू लागल्याने कार्यकर्त्यांची घालमेल सुरु झाली आहे.
इचलकरंजी राहुल आवाडे आघाडीवर इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदार संघामध्ये सुरुवाती पासूनच भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांनी आघाडी घेतली आहे. चौथ्या फेरी अखेर त्यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मदन कारंडे यांच्यापेक्षा ११९७७ मतांची आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विठ्ठल चोपडे यांना चौथ्या फेरी अखेर चार अंकी आकडाही गाठता आलेला नाही. चौथ्या फेरी अखेर त्यांना 434 मते मिळाली आहेत. राहुल आवाडे यांनी कोरोची, तारदाळ, खोतवाडी, कबनूर, चंदूर या ग्रामीण भागामध्ये आपला करिष्मा दाखवला आहे. कबनूरच्या एका बूथमध्ये फक्त कारंडे यांना मताधिक्य मिळाले आहे. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार शमशुद्दीन मोमीन यांनाही आपला करिष्मा दाखवता आलेला नाही.
राधानगरी विधानसभा सहाव्या फेरी अखेर अखेर आबिटकर ८०९२ मतांनी आघाडीवर,
चंदगड विधानसभा मतदारसंघ तिसरी फेरी राजेश पाटील (अजित पवार) १४१२नंदिनी बाभूळकर (शरद पवार) १४००शिवाजी पाटील (भाजप बंडखोर) २४८१अप्पी पाटील (काँग्रेस बंडखोर)- ७४१मानसिंग खोराटे(जनसुराज्य)- २४०भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील ३४१६ मतांनी आघाडीवर
तिसरी फेरी अखेर मतमोजणी 30603राजेश लाटकर काँग्रेस - 16847राजेश क्षीरसागर शिवसेना - 12986
राज्यातील सर्वाधिक मतदानाच्या २५ मध्ये कोल्हापूरचे पाच मतदारसंघ
- करवीर ८४.७९ टक्के
- कागल ८१.७२ टक्के
- शाहूवाडी ७९.०४ टक्के
- राधानगरी ७८.२६ टक्के
- शिरोळ ७८.०६ टक्के
व्यवस्था कशी...?
- इतक्या मतांची होणार मोजणी : २५,३२,६५७
- पोस्टल मते किती? : ४२४३०
- मतमोजणी करणारे एकूण अधिकारी, कर्मचारी
- २,१५२
१२१ उमेदवार रिंगणात
- चंदगड १७
- राधानगरी ०७
- कागल ११
- कोल्हापूर दक्षिण ११
- करवीर ११
- कोल्हापूर उत्तर ११
- शाहूवाडी १४
- हातकणंगले १६
- इचलकरंजी १३
- शिरोळ १०