कोल्हापूर : सहा महिने पक्षासाठी काम करा सत्ता आपलीच : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:57 PM2018-08-18T17:57:18+5:302018-08-18T18:02:42+5:30

केंद्र सरकारच्या हालचाली पाहता लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होण्याचे संकेत आहेत. कार्यकर्त्यांनी सहा महिने जीवाचे रान करून पक्षाचे काम करावे, त्यानंतर सत्ता आपलीच येईल. असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

Kolhapur: Work for party for six months, power is ours: Mushrif | कोल्हापूर : सहा महिने पक्षासाठी काम करा सत्ता आपलीच : मुश्रीफ

कोल्हापूर : सहा महिने पक्षासाठी काम करा सत्ता आपलीच : मुश्रीफ

Next
ठळक मुद्देसहा महिने पक्षासाठी काम करा सत्ता आपलीचहसन मुश्रीफ यांचे आवाहन : बूथ कमिटी संकल्प मेळावा

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या हालचाली पाहता लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होण्याचे संकेत आहेत. कार्यकर्त्यांनी सहा महिने जीवाचे रान करून पक्षाचे काम करावे, त्यानंतर सत्ता आपलीच येईल. असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित बूथ कमिटी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, राफेड विमान खरेदी मधील घोटाळा हा ‘बोफोर्स’ पेक्षा मोठा असून येत्या काही दिवसात देशातील सव्वाशे कोटी जनताच भाजप सरकारला याबाबत जाब विचारेल. त्यावेळी नरेंद्र मोदी यांचे तोंड उघडेल. समाजात कमालीची अस्वस्थता आहे, युवकांची जबाबदारी वाढली असून सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाऊन जनजागृती करा.

युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकार सूडाचे राजकारण करत आहे. सहकार, शिक्षणासह सर्वच क्षेत्राच्या मूळावर उठलेल्या सरकारला घालवण्यासाठी युवकांनी कंबर कसावी. सोशल मिडियावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सुरू असलेली चिखलफेक खपवून घेऊ नका.

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, बूथ कमिटीच्या कामात जिल्ह आघाडी राहिला असून दिल्लीच्या तख्तावर शरद पवार यांना बसवण्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करावे. माजी खासदार निवेदिता माने, सरचिटणीस अनिल साळोखे, कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास, नविद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले.

युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, संगीता खाडे, मधूकर जांभळे, गणपतराव फराकटे, नितीन जांभळे, शिवानंद माळी आदी उपस्थित होते.

वाजपेयी- गांधी यांच्या पैलूचे ‘लोकमत’मुळे समोर

दिवगंत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मेळाव्यात आदरांजली वाहण्यात आली. अजातशत्रू व्यक्तीमत्व हरपल्याचे निवेदिता माने यांनी सांगितले. ‘लोकमत’ने वाजपेयी यांच्या निधनानंतर प्रसिध्द केलेल्या अंकात विविध विषयांना स्पर्श केला.

राजीव गांधींनी त्यांना केलेली मदत आणि त्याविषयी वाजपेयी यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता यातून दोन मोठ्या पक्षांतील नेत्यांमधील वैयक्तीक संबधांचा वेगळा पैलूचे दर्शन झाल्याचे मुश्रीफ यांनी आवर्जून सांगितले.
 

 

Web Title: Kolhapur: Work for party for six months, power is ours: Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.