मोटू-पतलूच्या निर्मिर्तीत कोल्हापूरकराचा वाटा

By admin | Published: September 21, 2016 01:03 AM2016-09-21T01:03:13+5:302016-09-21T01:06:48+5:30

कलाक्षेत्रात भरारी : सागर ब्रह्मपुरे करतो कार्टून कॅरेक्टरची निर्मिती

Kolhapurkara's contribution towards Motu-Pallu | मोटू-पतलूच्या निर्मिर्तीत कोल्हापूरकराचा वाटा

मोटू-पतलूच्या निर्मिर्तीत कोल्हापूरकराचा वाटा

Next

 फुलेवाडी : कार्टूनचे आकर्षण बालकांना आहे, तेवढेच मोठ्यांनाही आहे. कार्टून वाहिन्यांमुळे लहान मुलं तर तासन्तास कार्टून पाहत बसलेली चित्र पाहावयास मिळतात. भीम, डोरेमॉन, मोटू-पतलू, टॉम अँड जेरी, निन्जा हातोडी, बेन टेन, मायटी राजू, शिवा यांसारखी पात्रं लोकप्रिय आहेत. सध्या मोटू-पतलू चिमुकल्यांचे जीव की प्राण आहेत.
या मोटू-पतलूचे कोल्हापूर कनेक्शन सुद्धा आहे. निक टी.व्ही.वर दाखविले जाणाऱ्या कार्टूनच्या निर्मितीत कोल्हापुरातील युवकाचा हात आहे. आश्चर्य वाटले ना? हो हे खरे आहे. कोल्हापुरातील 3डी अ‍ॅनिमेशन आर्टिस्ट सागर विजय ब्रह्मपुरे हा कोल्हापुरातून मोटू-पतलूचे अ‍ॅनिमेशन करतो.
सागरने जाहिरात कला हा विषय घेऊन जी.डी. आर्ट (कमर्शिअल) कलानिकेतन महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर मुंबईतील मॅक अकॅडमी, अंधेरी येथे अ‍ॅनिमेशनचा माया सॉफ्टवेअरचा दीड वर्षांचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्याने जाहिरात व अ‍ॅनिमेशनच्या कामाला सुरुवात केली. गेल्या अडीच वर्षांपासून तो माया एंटरटेनमेंट लिमिटेड या कंपनीमार्फत फ्री लान्स पद्धतीने (स्वतंत्रपणे) काम करीत आहे. ही कंपनी निक चॅनेलसाठी मोटू-पतलू हे कार्टून बनविते. मोटू-पतलूची वाढलेली लोकप्रियता पाहता कंपनीला स्वत:च्या निर्मितीबरोबरच मोटू-पतलू तयार करण्याचे काम बाहेर द्यावे लागत आहे.
सागर सांगतो की, मुंबईत 30 जणांच्या टीमला ११ मिनिटांचा मोटू-पतलूच्या अ‍ॅनिमशनचा भाग तयार करण्यासाठी पाच दिवस लागतात. आता हेच काम सागर व इतर आठ
ते दहाजणांचा ग्रुप देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून दहा ते पंधरा दिवसांत ११ मिनिटांचा मोटू-पतलूचा भाग पूर्ण करीत आहेत. त्यासाठी सागरलाही कोल्हापुरात दिवसांतून आठ ते दहा तास संगणकावर काम करावे लागते. दिलेल्या भागानुसार अ‍ॅनिमेशन करावे लागते. अ‍ॅनिमेशनमध्ये येणाऱ्या तरुणांनी कला, अ‍ॅनिमेशनची पूर्ण आवड व माहिती घेऊनच या क्षेत्रात यावे व पूर्णक्षमतेने, प्रामाणिकपणे काम करावे, असे सागर सांगतो.


सागरने गुरू, मिकी व्हायरस या सिनेमांसाठी तसेच ब्रिटानियाच्या जाहिरातीसाठीही काम केले आहे. काही परदेशी कंपन्यांसोबत काम करताना जॅक, आॅक्टोनटस्, ओझिबू, लेगो नायट्रोनिक्स यासारखी इंटरनॅशनल कार्टूनचे काही भाग बनविले आहेत. शाहू स्मारक येथे त्याच्या चित्रांचे प्रदर्शनही भरले होते. भविष्यात कोल्हापुरात अ‍ॅनिमेशन व जाहिरात क्षेत्रासाठी काम करण्याची इच्छा आहे.

Web Title: Kolhapurkara's contribution towards Motu-Pallu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.