शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
2
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
3
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
4
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
5
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
6
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
7
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
8
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
9
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
10
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
11
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
12
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
13
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
14
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
15
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
16
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
17
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
18
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
19
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
20
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"

मोटू-पतलूच्या निर्मिर्तीत कोल्हापूरकराचा वाटा

By admin | Published: September 21, 2016 1:03 AM

कलाक्षेत्रात भरारी : सागर ब्रह्मपुरे करतो कार्टून कॅरेक्टरची निर्मिती

 फुलेवाडी : कार्टूनचे आकर्षण बालकांना आहे, तेवढेच मोठ्यांनाही आहे. कार्टून वाहिन्यांमुळे लहान मुलं तर तासन्तास कार्टून पाहत बसलेली चित्र पाहावयास मिळतात. भीम, डोरेमॉन, मोटू-पतलू, टॉम अँड जेरी, निन्जा हातोडी, बेन टेन, मायटी राजू, शिवा यांसारखी पात्रं लोकप्रिय आहेत. सध्या मोटू-पतलू चिमुकल्यांचे जीव की प्राण आहेत.या मोटू-पतलूचे कोल्हापूर कनेक्शन सुद्धा आहे. निक टी.व्ही.वर दाखविले जाणाऱ्या कार्टूनच्या निर्मितीत कोल्हापुरातील युवकाचा हात आहे. आश्चर्य वाटले ना? हो हे खरे आहे. कोल्हापुरातील 3डी अ‍ॅनिमेशन आर्टिस्ट सागर विजय ब्रह्मपुरे हा कोल्हापुरातून मोटू-पतलूचे अ‍ॅनिमेशन करतो.सागरने जाहिरात कला हा विषय घेऊन जी.डी. आर्ट (कमर्शिअल) कलानिकेतन महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर मुंबईतील मॅक अकॅडमी, अंधेरी येथे अ‍ॅनिमेशनचा माया सॉफ्टवेअरचा दीड वर्षांचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्याने जाहिरात व अ‍ॅनिमेशनच्या कामाला सुरुवात केली. गेल्या अडीच वर्षांपासून तो माया एंटरटेनमेंट लिमिटेड या कंपनीमार्फत फ्री लान्स पद्धतीने (स्वतंत्रपणे) काम करीत आहे. ही कंपनी निक चॅनेलसाठी मोटू-पतलू हे कार्टून बनविते. मोटू-पतलूची वाढलेली लोकप्रियता पाहता कंपनीला स्वत:च्या निर्मितीबरोबरच मोटू-पतलू तयार करण्याचे काम बाहेर द्यावे लागत आहे.सागर सांगतो की, मुंबईत 30 जणांच्या टीमला ११ मिनिटांचा मोटू-पतलूच्या अ‍ॅनिमशनचा भाग तयार करण्यासाठी पाच दिवस लागतात. आता हेच काम सागर व इतर आठ ते दहाजणांचा ग्रुप देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून दहा ते पंधरा दिवसांत ११ मिनिटांचा मोटू-पतलूचा भाग पूर्ण करीत आहेत. त्यासाठी सागरलाही कोल्हापुरात दिवसांतून आठ ते दहा तास संगणकावर काम करावे लागते. दिलेल्या भागानुसार अ‍ॅनिमेशन करावे लागते. अ‍ॅनिमेशनमध्ये येणाऱ्या तरुणांनी कला, अ‍ॅनिमेशनची पूर्ण आवड व माहिती घेऊनच या क्षेत्रात यावे व पूर्णक्षमतेने, प्रामाणिकपणे काम करावे, असे सागर सांगतो.सागरने गुरू, मिकी व्हायरस या सिनेमांसाठी तसेच ब्रिटानियाच्या जाहिरातीसाठीही काम केले आहे. काही परदेशी कंपन्यांसोबत काम करताना जॅक, आॅक्टोनटस्, ओझिबू, लेगो नायट्रोनिक्स यासारखी इंटरनॅशनल कार्टूनचे काही भाग बनविले आहेत. शाहू स्मारक येथे त्याच्या चित्रांचे प्रदर्शनही भरले होते. भविष्यात कोल्हापुरात अ‍ॅनिमेशन व जाहिरात क्षेत्रासाठी काम करण्याची इच्छा आहे.