इचलकरंजी : चंदूर (ता हातकणंगले) येथील मेडिकल, किराणा दुकानदार, पानशॉप, भाजी विक्रेते, अशा ३१० सुपरस्प्रेडर नागरिकाची कोवीड आर.टी.पी.सी.आर.तपासणी व २ जणांची ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल सोमवार पर्यंत प्राप्त होईल. अशी माहिती आरोग्य सेवक संजय पाटील यांनी दिली.गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य केले. यांच्या तपासणीचा प्राप्त झाल्यानंतर गावात समूह संसर्ग झाला आहे किंवा नाही याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानुसार पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत.
या तपासणी शिबीरासाठी प.स. सदस्य महेश पाटील, सरपंच अनिता माने, प्राथमिक आरोग्य केंद्र पट्टणकोडोलीचे वैद्यकीय अधिकारी बोरगावे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.समीना हिरोली, वैज्ञानिक अधिकारी रेश्मा शिकलगार , आर.ए.तराळ, आरोग्य सेविका दिपाली कुंभार, तलाठी सीमा धोत्रे, पोलीस पाटील राहुल वाघमोडे, डाटा ऑपरेटर यशवंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच उपकेंद्र चंदूर येथील सर्व आशा या सर्वाचे सहकार्य लाभले.