उद्यापासून चार दिवस कोयना एक्सप्रेस रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 10:42 AM2020-12-29T10:42:24+5:302020-12-29T10:46:56+5:30
Miraj Kolhapur railway-कोल्हापूर-मुंबई लोहमार्गावर धावणारी कोयना एक्सप्रेस दुहेरीकरणाच्या कामामुळे बुधवारी (दि.३०) ते २ जानेवारी २०२१ या दरम्यान चार दिवस रद्द करण्यात आली आहे.
ठळक मुद्देउद्यापासून चार दिवस कोयना एक्सप्रेस रद्दमार्गावर दुहेरीकरणाचे काम सुरु, चार दिवसांमध्ये मेगाब्लॉक
कोल्हापूर : कोल्हापूर-मुंबई लोहमार्गावर धावणारी कोयना एक्सप्रेस दुहेरीकरणाच्या कामामुळे बुधवारी (दि.३०) ते २ जानेवारी २०२१ या दरम्यान चार दिवस रद्द करण्यात आली आहे.
कोयना एक्सप्रेस मिरज-पुणे मार्गावरील सिंदवणे-आळंदी येथे दुहेरीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या चार दिवसांमध्ये मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे यामार्गावरून धावणारी कोयना एक्सप्रेस चार दिवस रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान मंगळवारी सकाळी मुंबईहून येणारी कोयना एक्सप्रेस पुणे येथपर्यंत धावणार आहे. तर यशवंत -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस कुर्डुवाडी मार्गे मिरजला येणार आहे. अशी माहीती रेल्वेच्या सुत्रांनी दिली.