कोल्हापूर : कोल्हापूरच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच पर्यटन विकासासाठी एखादी संस्था पुढे येऊन लोकसहभागातून शाश्वत विकासाला हातभार लावत असेल तर त्याला विरोध करणे हे कोल्हापूरच्या विकासात अडथळा बनेल. शहर सौंदर्यीकरण प्रकल्पाला राजकीय रूप दिले व गटातटांच्या राजकारणामध्ये नेहमीप्रमाणे होणाºया विकासात अडथळा निर्माण करण्याची चुरस निर्माण झाली आहे, अशा शब्दांत ‘केएसबीपी’चे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी महानगरपालिकेतील काँग्रेस पदाधिकाºयांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.शहरातील चौक, रस्ते सुशोभित करण्याकरीता ‘केएसबीपी’या संस्थेने प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावातील करार करण्याचे अधिकार मागितले असल्याने त्यास महानगरपालिकेतील काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तसेच नगरसेवकांनी हरकत घेतली आहे. पालिकेच्या नावावर कोणी पैसे मिळविणार असेल तर आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका उपमहापौर अर्जुन माने, गटनेते शारंगधर देशमुख यांनी घेतली आहे. त्यास अनुसरून पित्रे यांनी मंगळवारी खुलासा केला आहे.पित्रे यांनी पत्रकात म्हटले आहे की, शहरात महापालिकेचे ५० हून अधिक उद्याने व बगीचे असून त्याची कोणतीही निगा राखली जात नाही तसेच रंकाळा तलावाची तसेच तेथील उद्यानाची दुरावस्था झाली आहे. अशावेळी शहर सौंदर्यीकरणासाठी व पर्यटन विकासासाठी एखादी संस्था पुढे येऊन लोकसहभागातून शाश्वत विकासास हातभार लावत असेल तर त्याला विरोध करणे व स्वत:ही धोरणात्मक निर्णय न घेणे हा खºया अर्थाने विकासामधील एक प्रमुख अडथळा ठरणार आहे. त्यामुळे येथून पुढचे सर्व प्रस्ताव लालफितीत गुंडाळून एका कपाटात धूळ खात पडतील; पण त्यापूर्वीच आम्ही जाहीर करत आहोत की आम्हाला महानगरपालिकेकडून कोणतेही अधिकार नको आहेत. आम्हाला कोणताही करार करण्यास स्वारस्य नाही. पूर्वीप्रमाणेच केएसबीपी जे प्रयत्नपूर्वक प्रकल्प उभारले आहेत, जी झाडे लावली आहेत त्यांचे संगोपन करण्यात येईल.महानगरपालिकेला रामराम‘केएसबीपी’द्वारे शासकीय संस्थांचे पाठबळ, उद्योग जगताची मदत यातून शहराचे रूप कसे पालटू शकते, हे आम्हाला सिद्ध करायचे होते. त्यासाठी आम्ही ना पक्ष पाहिला, ना प्रभाग पाहिला. या सर्व प्रक्रियेत यापुढे कोल्हापूर महानगरपालिकेचा समावेश राहणार नसून, जिल्ह्यातील इतर शासकीय तसेच अशासकीय संस्था यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली आहे, असे सुजय पित्रे यांनी म्हटले आहे.
‘केएसबीपी’ यापुढे शहरात काम करणार नाही : सुजय पित्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:34 AM
कोल्हापूर : कोल्हापूरच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच पर्यटन विकासासाठी एखादी संस्था पुढे येऊन लोकसहभागातून शाश्वत विकासाला हातभार लावत असेल तर त्याला विरोध करणे
ठळक मुद्दे राजकारणाने शाश्वत विकासाला अडथळाकाँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तसेच नगरसेवकांनी हरकत घेतली