कुंभी कासारी बँकेला दोन कोटी ५० लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:26 AM2021-05-25T04:26:27+5:302021-05-25T04:26:27+5:30
सोमवारी कुडित्रे, ता. करवीर येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष अजित नरके यांनी ही माहिती दिली. यावेळी ...
सोमवारी कुडित्रे, ता. करवीर येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष अजित नरके यांनी ही माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अजित नरके म्हणाले, कोरोनाचा कठीण काळ असतानाही बँकेची आर्थिक वर्षात वार्षिक उलाढाल ११४ कोटींची झाली आहे, तर १४६ कोटींचा व्यवसायही झाला आहे. सभासद व ग्राहकांच्या सहकार्याने बँकेच्या ठेवी सध्या ९२ कोटींवर पोहोचल्या आहेत, तर ५६ कोटींची कर्जे वाटप केली आहेत. बँकेने ४६ कोटी गुंतवणूक केली आहे. कुंभी बँकेने अण्णासाहेब पाटील योजनेच्या माध्यमातून युवकांना कर्जे वाटप केली असून, त्याचा परतावा चांगला आहे.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या काळातही सभासद व ग्राहकांचे सहकार्य व कर्मचाऱ्यांनी व संचालक मंडळाने केलेले वसूल व कर्ज वाटपाचे नियोजन यामुळे आर्थिक वाटचाल उत्तम ठेवली आहे. बँकेने नवीन शाखांसाठी प्रस्ताव दिले आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयाशिवाय ६ शाखा आहेत. यातील ५ स्वमालकीच्या इमारतीत आहेत. बँकेने स्वनिधीतून भरघोस वाढ केली आहे. बँकेने सध्या एटीएम पॉज मशीन, एसएमएस, आरटीजीएस, एनईएफटी, सीटीएस, क्लिअरिंग सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. नेट बँकिंगसाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच ही सेवा देणार असल्याचे सांगितले. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक डी. एस. राऊत उपस्थित होते.