महाडिकांना संपविण्याची भाषा सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:23 AM2021-04-25T04:23:53+5:302021-04-25T04:23:53+5:30

नेसरी : जिल्हा महाडिकमुक्त करण्याची भाषा काहीजण करीत आहेत. परंतु, महाडिकांनी इतके काय वाईट केले आहे? आजपर्यंत पाच ...

Leave the language to end the Mahadikas | महाडिकांना संपविण्याची भाषा सोडा

महाडिकांना संपविण्याची भाषा सोडा

Next

नेसरी : जिल्हा महाडिकमुक्त करण्याची भाषा काहीजण करीत आहेत. परंतु, महाडिकांनी इतके काय वाईट केले आहे? आजपर्यंत पाच निवडणुका लढविल्या. त्यातील एकच जिंकलो. चार वेळा हरलो म्हणजे काय मी संपलो नाही. जिंकणे-हरणे हा लढाईचा भाग आहे. लढाई करायचीच असेल तर तत्त्वांची करावी. महाडिकांना संपविण्याची भाषा सोडून द्यावी, अशा शब्दांत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी नामोल्लेख टाळून पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.

कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमू पाटील होते. माजी आमदार महादेवराव महाडिक व संजय घाटगे, जिल्हा बँकेचे माजी संचालक भय्या कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेचे संग्राम कुपेकर व बाळ कुपेकर यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला.

महाडिक म्हणाले, 'गोकुळ' हा दूध उत्पादकांना ८१ टक्के परतावा देणारा आशिया खंडातील एकमेव संघ आहे. साडेपाच लाख दूध उत्पादकांना 'गोकुळ'चा आधार आहे.

भरमू पाटील म्हणाले, गोकुळची धुरा महाडिक व पी. एन. पाटील यांनी समर्थपणे सांभाळली आहे.

बाळ कुपेकर म्हणाले, अखेरपर्यंत आपल्याला झुलवत ठेवून विरोधी आघाडीने आपल्यावर अन्याय केला. म्हणूनच सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी गडहिंग्लज कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, बी. एम. पाटील-वाघराळीकर, कृष्णराव वाइंगडे, तानाजी पाटील, भरमाण्णा गावडा यांचीही भाषणे झाली.

मेळाव्यास उमेदवार सदानंद हत्तरकी, सम्राट महाडिक, रणजितसिंह पाटील-मुरगुडकर, वसंत नंदनवाडे, आदी उपस्थित होते.

--

नेसरी ( ता. गडहिंग्लज ) येथील मेळाव्यात माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Leave the language to end the Mahadikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.