विधीमंडळ म्हणजे डुप्लिकेट चोरमंडळ; संजय राऊतांचा आमदारांवर गंभीर आरोप

By समीर देशपांडे | Published: March 1, 2023 02:39 PM2023-03-01T14:39:24+5:302023-03-01T14:40:05+5:30

संजय राऊत यांचा आरोप, कणेरी मठावरील गायींच्या मृ़त्युची चौकशी करा

Legislature means duplicate, thief; Sanjay Raut's attack on MLAs | विधीमंडळ म्हणजे डुप्लिकेट चोरमंडळ; संजय राऊतांचा आमदारांवर गंभीर आरोप

विधीमंडळ म्हणजे डुप्लिकेट चोरमंडळ; संजय राऊतांचा आमदारांवर गंभीर आरोप

googlenewsNext

समीर देशपांडे

कोल्हापूर - विधीमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही. हे मंडळ म्हणजे डुप्लिकेट चोर मंडळ आहे अशी घणाघाती टीका खासदार संजय राउत यांनी येथे केली आहे. ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कणेरी मठावरील गायींच्या मृत्युच्या चौकशीचीही मागणी केली.    

राउत म्हणाले,  त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण  अशी अनेक पदे आम्हाला पक्षाने दिली, लोकांची गर्जना काय  आहे. काल आपण धाराशिवला पाहिले. ज्या पद्धतीने बच्चू कडू यांना जाब विचारण्यात आला तो जाब म्हणजे शिवगर्जना.  ही गर्जना पोहचविण्यासाठी  महाराष्ट्रात जात आहोत. कोल्हापुरात आल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत होत आहे हे दिसू आले आहे. लोकसभेबाबत आता आम्ही चर्चा करू.

सरकार बदलताच अनेक चोरांना क्लीन चीट देण्यात आली.  पण दुसरीकडे जो जाब विचारतो,  त्याला तुरुंगात टाकायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचं अस षडयंत्र रचले जात आहे , पण जनता  २०२४ ला याचा सर्व हिशोब करेल.  कोविड काळात  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सुविधा  उत्तम पध्दतीने दिल्या गेल्या. इकबालसिंह  चहल यांनी हे स्वतः सांगितले आहे. कोविड संदर्भात गुन्हा दाखल करायचा असेल तर योगी  आदित्यनाथ यांच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल करावा लागेल. कारण अनेक प्रेतं गंगेतून वाहून  गेली.  या काळात  गुजरातमध्ये स्मशानभूमीत रांगा  लागल्या होत्या, त्यामुळे आरोप करणाऱ्यानी  सर्वात प्रथम त्या ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करावा. 
 

पुण्यात कसबा निवडणुक  आपण हरतो आहोत हे जेव्हा भाजपला कळले तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला. यंत्रणेचा  वापर करून तुम्ही राज्य करणार असाल तर हे राज्य कोलमडून पडेल. चिंचवड ची जागा कोण जिंकेल हे भाजपला सांगता येत नाही हा भाजपचा पराभव आहे. पालघर मधील साधूंचा मृत्यू आणि कणेरी मठावरील गाईंचा मृत्यू आम्ही समान मानतो. कणेरी मठावरील गायीच्या मृत्यूची चौकशी  झाली पाहिजे.  आमचे आमदार आज विधिमंडळात गाईंना श्रद्धांजली वाहतील.

सोमय्यांविरोधात न्यायालयात जाणार

आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली ज्या एका चोरानं म्हणजे किरीट  सोमयाने लाखो, करोडो रुपये गोळा केले, त्याची चौकशी सुरू असताना सरकार बदललं आणि चौकशी थांबली. पण मी स्वत  विक्रातचे पैसे कुठे गेले, विचारणार आहे आणि न्यायालयात जाणार आहे असे राउत म्हणाले. 
 

Web Title: Legislature means duplicate, thief; Sanjay Raut's attack on MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.