आमदार निधीतून गरजू गरीब रुग्णांना कोरोनावरील महाग औषधे मोफत देण्यासाठी काय तरतूद करावी लागेल, याची माहिती तत्काळ प्रशासनाने द्यावी, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनेसाठी सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे आश्वासन आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिले.
शाहूवाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व यावर उपाययोजना याबाबत शाहूवाडी पन्हाळाचे आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या व त्यावर केलेली उपाययोजना याबाबत सर्व संबंधित विभागाकडून आढावा घेतला. आमदार निधीच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी सर्वतोपरी मदत केली जाणार असून, प्रशासनाने आवश्यक त्या बाबींचा तत्काळ अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार निधीच्या माध्यमातून सर्व मदत करण्यात येईल शाहूवाडी तालुक्यात लसीकरणाचे काम डॉक्टरांनी अतिशय उत्कृष्ट केले आहे. याबद्दल आरोग्य विभागाचे विशेष कौतुक आहे.
या आढावा बैठकीस तहसीलदार गुरु बिराजदार, जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील, नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप कोटकर ,पोलीस निरीक्षक विजय पाटील, मलकापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे, डॉ आशुतोष तराळ, माजी उपसभापती महादेव पाटील , विष्णू पाटील , नगरसेवक अशोक देशमाने , प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
शाहूवाडी पंचायत समिती येथे आढावा बैठकीत बोलताना आमदार विनय कोरे, तहसीलदार गुरु बिराजदार, अनिल वाघमारे , सर्जेराव पाटील आदी.