हातकणंगले तालुक्यात स्थानिक मटका तेजीत,तीन बुक्कीमालकांची सुभेदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 11:07 PM2018-03-02T23:07:54+5:302018-03-02T23:07:54+5:30
हातकणंगले : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ गावांमध्ये मटका खेळणाºया आणि गोळा करणाºया ग्राहकांनी मुंबई- कल्याणकडे पाठ फिरविली असून, रुकडी, हातकणंगले आणि मुडशिंगी या स्थानिक पातळीवरील बुकी मालकांच्या ओपन व क्लोजच्या
दत्ता बिडकर
हातकणंगले : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ गावांमध्ये मटका खेळणाºया आणि गोळा करणाºया ग्राहकांनी मुंबई- कल्याणकडे पाठ फिरविली असून, रुकडी, हातकणंगले आणि मुडशिंगी या स्थानिक पातळीवरील बुकी मालकांच्या ओपन व क्लोजच्या लकी नंबरवर नशीब आजमावयाला सुरुवात केल्यामुळे स्थानिक मटका तेजीत आहे.
हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ गावांमध्ये स्थानिक बुक्कीमालकांनी स्वत:च्या हिमतीवर मटकाबुक्कीचा डोलारा उभा केला आहे. २१ गावांची तीन बुक्कीमालकांनी सुभेदारीच्या वाटणीप्रमाणे वाटणी करून घेऊन आपल्या व्यवसायाची पाळेमुळे घट्ट केली आहेत. तीन बुक्कीमालकांनी गावांची वाटणी करून घेताना एकमेकांच्या हद्दीत हस्तक्षेप करायचा नाही, असा आलिखित करारच करून घेतला आहे.
हेरलेपासून रुकडीपर्यंत तसेच पेठवडगाव परिसरासह पुलाची शिरोली परिसरातील अतिग्रे, चोकाक, माले, मुडशिंगी, हेरले, हालोंडी, नागाव, शिरोली, मौजे वडगाव, तासगाव, टोपपर्यंतचा भाग मुडशिंगी येथील बुक्कीमालकाने आपल्याकडे घेतला आहे. तर रुकडी, माणगाव, रुई, साजणी, तिळवणी, नदीपालीकडील पट्टणकोडोली, इंगळी, तळंदगेपर्यंतचा भाग रुकडीच्या बुक्कीमालकाकडे. हातकणंगलेसह औद्योगिक वसाहत आळते, लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी, नरंदे, कुंभोज, हिंगणगाव, मजले, तारदाळ, कोरोचींमध्ये हातकणंगलेच्या बुक्कीमालकाने जम बसविला आहे.
अनेक कुटुंंबे उद्ध्वस्त
तीन बुक्कीमालकानी मुंबई, कल्याणच्या मटक्याची वाट न पाहता सामुदायिक तिघांनी मिळून ज्या त्या दिवसाच्या मागणीप्रमाणे आणि फायद्याप्रमाणे ओपन आणि क्लोज
चालकी नंबर जाहीर करून स्वत:च्या मटका व्यवसायाचे बस्तान बसविले आहे. या संपूर्ण मटका व्यवसायाकडे पोलिसानी मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
पोलीस अधीक्षक आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक यांनी स्वतंत्र आदेश देऊन कारणे दाखवा नोटीस देऊनही स्थानिक मटका जोरात असल्यामुळे पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.