CoronaVirus In Kolhapur : जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 01:52 PM2021-05-22T13:52:50+5:302021-05-22T13:54:28+5:30
CoronaVirus In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेला कडक लॉकडाऊन सोमवारपासून (दि. २४) शिथील होण्याची शक्यता आहे. याबाबत आज शनिवारी सायंकाळी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेला कडक लॉकडाऊन सोमवारपासून (दि. २४) शिथील होण्याची शक्यता आहे. याबाबत आज शनिवारी सायंकाळी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा सध्या उच्चांक असून रोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारावर आहे. तर मृत्यूचेही सरासरी प्रमाण ५० इतके आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने मागील शनिवारपासून (दि. १५) जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला होता.
याचा कालावधी उद्या रविवारी रात्री बारा वाजता संपणार आहे. शनिवारी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतना कडक लॉकडाऊन वाढवणार नसल्याचे संकेत दिले. मात्र त्याची अधिकृत घोषणा सायंकाळी होणार आहे.