कोल्हापूर/ कोपार्डे : धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी विचारातच घेतले नसल्याची तक्रार ज्येष्ठ नेत्यांनी महादेवराव महाडिक यांच्या समोर मांडताच त्यांनी तात्काळ तेथूनच फोन करत त्यांची कानउघडणी केली.
ज्येष्ठ नेत्यांनी धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विचारातच घेतले नसल्याची तक्रार महादेवराव महाडिक यांच्या समोर मांडली. तात्काळ तेथूनच धनंजय महाडिकांना फोन करत त्यांची कान उघडणी केली.
खुपीरे ता.करवीर येथे धावत्या दौऱ्याच्यावेळी आज महादेव महाडिक बोलत होते. तुकाराम पाटील, सरदार बंगे, सर्जेराव पाटील या नाराज असलेल्या गटाची भेट घेऊन त्यांच्या बरोबर चर्चा करत साथ देण्याची हाक दिली.
यावेळी तुम्हाला राजकीय ताकदिचे कार्यकर्ते ओळखता येतात की नाही, ज्यांनी आम्हाला आज पर्यंत सर्वत्र मदत केली, त्यांचा अपमान खपवून घेणार नाही असे खडसावले. यानंतर झालेल्या चुका सुधारू हा महादेवराव महाडिकांचा शब्द आहे असे त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये सगळ्यांची समजूत घातली.
धनंजय महाडिक यांच्या काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याचे अभिवचन मी देतो. पण यावेळी धनंजय महाडिक यांना मदत करा अशी विनंती करत यावेळी पी. एन. पाटील यांना आमदार करणार असून गोकूळच्या सभेत नाचणाऱ्या आमदाराला विधानसभेच्या निवडणुकीत नाचवणार असे आ. चंद्रदिप नरके यांचे नाव न घेता धमकी दिली.यावेळी झालेल्या चर्चेत महादेव महाडिक म्हणाले, जर पी.एन.पाटील आमदार झाले नाहीत तर महादेव महाडिकांचे राजकरण संपणार आहे.
यासाठी आता पी.एन. पाटील यांना आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, जर असे झाले नाही तर गोकुळमधून आम्हाला हाकलायला हे मागे पुढे पहाणार नाहीत. हा महाडिक एखाद्याचे मागे लागला तर त्याला संपविल्याशिवाय राहत नाही, असा दमच आ. चंद्रदिप नरके, आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता दिला.
यावेळी कुंभीचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील माजी उपाध्यक्ष तुकाराम पाटील माजी सरपंच प्रकाश चौगले, सरदार बंगे,स.नि. पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.खुपीरे ता करवीर येथे धावत्या दौऱ्यादरम्यान बजरंग दूध संस्थेत झालेल्या बैठकीत बोलताना माजी आ.महादेवराव महाडिक शेजारी तुकाराम पाटील सर्जेराव पाटील स. नि. पाटील, सरदार बंगे प्रकाश चौगले व कार्यकर्ते