Navratri2022: सहाव्या माळेला जोतिबाची पाचकमळ पुष्पात महापुजा, उद्या जागर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 06:07 PM2022-10-01T18:07:01+5:302022-10-01T18:08:44+5:30

नवरात्रोत्सवाचा जोतिबा देवाचा जागर इतर देवदैवताच्या आधी होतो

Mahapuja of Jotiba in Pachamal flowers on the sixth occasion of Navratri festival | Navratri2022: सहाव्या माळेला जोतिबाची पाचकमळ पुष्पात महापुजा, उद्या जागर

Navratri2022: सहाव्या माळेला जोतिबाची पाचकमळ पुष्पात महापुजा, उद्या जागर

Next

दत्तात्रय धडेल

जोतिबा: नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला जोतिबाची पाचकमळ पुष्पात महापुजा बांधण्यात आली. आजची पूजा मानाचे दहा गांवकर यांनी बांधली. जोतिबा डोंगरावर स्थापित नवदुर्गाचे दर्शन स्थानिक नवरात्र उपासकांनी पायी चालत घेतले. देवाला फलाहार नैवेद्य नवरात्र उपासकांनी दाखवला. उद्या, रविवारी सातव्या माळेला जोतिबाचा जागर होणार आहे.

नवरात्रोत्सवाचा जोतिबा देवाचा जागर इतर देवदैवताच्या आधी साजरा होतो. रविवारी जागरा निमित्त श्री. जोतिबा देवाची चार मुक्तीचे प्रतिक दाखविणाऱ्या चौफुल्यामध्ये महापुजा बांधण्यात येईल. पुजेपुढे उन्मेष नावाचा अश्व (घोडा) अर्पण केला जाईल. मंदिराच्या दरवाज्यावर सीताफळ, कवडांळ, बेल, फुलांचे तोरण बांधले जातील. फलाहाराची पाच ताटाचा नैवेद्य वाजत गाजत यमाई मंदिराकडे जातो. उंट, घोडे वाजंत्री, देव सेवकाच्या लवाजम्यासह धुपारती सोहळा निघेल. मंदिरात भजनाचा कार्यकम होतो. रात्रभर मंदिर खुले ठेवले जाते.

Web Title: Mahapuja of Jotiba in Pachamal flowers on the sixth occasion of Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.