मरण्यापूर्वी तरी ठेवींचे पैसे द्या! ‘भुदरगड’च्या ठेवीदारांची मागणी : दहा वर्षांत केवळ २५ हजार ठेवीदारांचे पैसे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:27 AM2018-01-12T00:27:24+5:302018-01-12T00:32:39+5:30

कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांची अवस्था केविलवाणी झाली असून, दहा वर्षांत जेमतेम २५ हजार ठेवीदारांचे पैसे अवसायकांना देता आले आहेत.

 Make deposits before you die! Demand for 'Bhoodargad' deposits: In the last ten years, only 25,000 depositors' money will be returned | मरण्यापूर्वी तरी ठेवींचे पैसे द्या! ‘भुदरगड’च्या ठेवीदारांची मागणी : दहा वर्षांत केवळ २५ हजार ठेवीदारांचे पैसे परत

मरण्यापूर्वी तरी ठेवींचे पैसे द्या! ‘भुदरगड’च्या ठेवीदारांची मागणी : दहा वर्षांत केवळ २५ हजार ठेवीदारांचे पैसे परत

Next
ठळक मुद्दे१ लाख ७३ हजार ठेवीदारांचे १२६ कोटी रुपये देणे होते, तर १८४ कोटी थकीत कर्जे होती.अजून दीड लाख ठेवीदारांचे १०५ कोटी रुपये देणे

राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांची अवस्था केविलवाणी झाली असून, दहा वर्षांत जेमतेम २५ हजार ठेवीदारांचे पैसे अवसायकांना देता आले आहेत. अद्याप दीड लाख ठेवीदार आपल्या आयुष्याची पुंजी परत मिळविण्यासाठी धडपडत आहेत.

उतरत्या वयात औषध-पाण्यासाठी पैसे नसल्याने या ठेवीदारांची आबाळ झाली असून किमान मरण येण्यापूर्वी तरी आमचे पैसे मिळणार का? असा उद्विग्न सवाल या पतसंस्थेचे ठेवीदार करीत आहेत.‘भुदरगड’ पतसंस्थेच्या ५२ शाखांच्या माध्यमातून हजारो गोरगरीब कुटुंबाचे संसार उभे राहिले; पण संचालक मंडळाच्या गैरव्यवस्थापनामुळे पतसंस्था आतबट्ट्यात आली आणि फेबु्वारी २००७ मध्ये अवसायक आले; पण सन २००२ पासूनच संस्थेला कीड लागण्यास सुरुवात झाल्याने काही ठेवीदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अवसायक आले त्यावेळी १ लाख ७३ हजार ठेवीदारांचे १२६ कोटी रुपये देणे होते, तर १८४ कोटी थकीत कर्जे होती.

सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थेचे कामकाज सुरू आहे. संस्थेने स्वभांडवलातून दहा हजार रुपयांपर्यंत, तर शासनाच्या पॅकेजमधून वीस हजार रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना पैसे देण्यास सुरुवात केली आहे; पण गेल्या दहा वर्षांत केवळ २५ हजार ठेवीदारांनाच पैसे देता आले. अजून दीड लाख ठेवीदारांचे १०५ कोटी रुपये देणे असून, १५६ कोटी कर्जाची वसुली होणे आहे.पतसंस्थेच्या १७ मालमत्ता असून त्याची किंमत ३० कोटी आहे. त्याचबरोबर कर्जदारांच्या तारण मालमत्ता साडेचारशेपर्यंत आहेत; पण या मालमत्तांची विक्रीच होत नसल्याने वसुली थंडावली आहे.

‘सहकार पंढरी’ असणाºया कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत अनेक पतसंस्थांनी आपला गाशा गुंडाळल्याने सामान्य माणसाला ठेवीच्या रूपाने गळफास लागला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विचार करायचा झाल्यास ‘भुदरगड’, ‘तपोवन’, ‘मानिनी’ या पतसंस्थांमध्ये लाखो ठेवीदार अडकले आहेत. सध्या या संस्थांवर अवसायक असून ‘कर्जाची वसुली होईना आणि ठेवी परत जाईना,’ अशी अवस्था पाहावयास मिळत आहे, त्यानिमित्त या संस्थांचा घेतलेला आढावा......

एकत्र ठेवींचा फटका
एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या चार-पाच ठेवपावत्यांच्या माध्यमातून पतसंस्थेत पैसे ठेवले होते. या पावत्यांची रक्कम दहा अथवा वीस हजारांपेक्षा कमी असली तरी चार पावत्यांची एकत्रित रक्कम केल्याने ही रक्कम वीस हजारांपेक्षा जास्त होते. त्यामुळे संबंधित ठेवीदाराला लाभ घेता येत नाही.
 

ठेवींपेक्षा खर्चच अधिक
‘भुदरगड’चे ठेवीदार हे भाजीपाला विक्रेते, चहाटपरीवाले असे सामान्य वर्गातील असल्याने ठेवींची रक्कम फारच कमी आहे. त्यात ठेवीदाराचे खाते नसेल तर पाचशे रुपये भरून खाते उघडावे लागते, ठेवीदार मृत असला तर त्याच्या वारसांचे शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. पाचशेच्या ठेवींसाठी सातशे रुपये खर्च होत असल्याने प्रतिसाद मिळत नाही.

अवसायकांना पाच वर्षांची मुदतवाढ
सहकार कायद्यानुसार एखाद्या संस्थेचा अवसायक कालावधी दहा वर्र्षांपेक्षा जास्त असत नाही; पण ठेवीदारांचे हित लक्षात घेता सहकार ‘कलम १५७’ प्रमाणे अवसायक मुदतवाढीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे पाठविला असून, त्याला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

Web Title:  Make deposits before you die! Demand for 'Bhoodargad' deposits: In the last ten years, only 25,000 depositors' money will be returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.