कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज ह्यराज्याभिषेक दिनह्ण सोहळा रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध तरुण मंडळे, तालीम, संस्था यांनी कोरोनासंबंधीची नियमावलीचे पालन करीत छत्रपती शिवाजी चौक व निवृत्ती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक आणि विविध ठिकाणी प्रतिमा पूजनाचे आयोजन केले होते. जयभवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी आणि साखर, पेढे वाटण्यात आले.मराठा महासंघ व शिवप्रेमीमराठा महासंघ व शिवप्रेमींतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास रविवारी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते व महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अॅड. गुलाबराव घोरपडे, माजी महापौर आर. के. पोवार, कादरभाई मलबारी, बबनराव रानगे, डॉ. संदीप पाटील, महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शंकरराव शेळके, आनंदराव म्हाळुंगेकर, अशोक माळी, शिवमूर्ती झगडे, प्रकाश पाटील, महादेव पाटील, उत्तम जाधव, प्रकाश जाधव, शैलजा भोसले, संयोगिता देसाई, लीला जाधव, नीता लाड-पोवार, गोपाळ पाटील, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, पारस ओसवाल, मदन बागल, महादेव केसरकर, अरुण कळकूटकी, मारुती पोवार आदी उपस्थित होते. यानिमित्त शाहीर मिलिंद सावंत, अरुण सावंत, शिवतेज ठोंबरे, शाहूराज सावंत यांनी शिवरायांचा जयजयकार पोवाडा गायला. मराठा स्वराजय भवन ट्रस्टतर्फे एन ९५ मास्कचे वाटप करण्यात आले.शिवसेनेतर्फे शिवराज्याभिषेक दिन उत्साहातशिवसेनेच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोठ्या संख्येने हिंदुत्त्ववादी संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक यांच्यावतीने शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी माजी खासदार धनंजय महाडीक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजू हुंबे, बंडा साळोखे, अशोक देसाई, शाम जोशी, संजय साडविलकर, उदय भोसले, अरुण सावंत, जयवंत हारुगले, किशोर घाटगे, सुनील जाधव, अजित गायकवाड, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, धनाजी दळवी, रमेश खाडे, रणजित जाधव, सुनील खोत, राजू काझी, नीलेश हंकारे, अंकुश निपाणीकर, चेतन शिंदे, पीयूष चव्हाण, शैलेश साळोखे, दादू शिंदे, शहाजी तरुण मंडळाचे उदय शिंदे, सागर शिंदे, कपिल केसरकर, संजय केसरकर आदी उपस्थित होते.शिवाजी पेठ, निवृत्ती चौक शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रविवारी सकाळी ज्येष्ठांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी माधवराव सरनाईक, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, सुरेश मगदूम, मुकुंद श्रीखंडे, श्रीकांत चिले, भरत पाटील, सुभाष पाटील, संदीप साठे, रामचंद्र इंगवले, किरण राऊत, सचिन वडगावकर, उदय देशमाने, तेजस जाधव, सचिन जाधव, रितेश जाधव आदी उपस्थित होते. या सोहळ्याचे नियोजन राजेंद्र जाधव यांनी केले होते.मर्दानी राजा सुहासराजे ठोंबरे आखाडाशिवाजी पेठेतील खंडोबा-वेताळ तालमीच्या मर्दानीराजा सुहासराजे ठोंबरे आखाड्याच्यावतीने रविवारी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. मावळा शाहीर मिलिंद सावंत यांनी राज्याभिषेक विषयी माहिती सांगून पोवाडा सादर केला. वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्या हस्ते शिवमूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरला गायकवाड, शीतल ठोंबरे, मनीषा ठोंबरे, किरण जाधव, शिवबा सावंत, शिवतेज ठोंबरे, शाहूराज सावंत, सिद्धार्थ सावंत, सुनील राऊत, सिद्धेश मोरे, अथर्व जाधव आदी उपस्थित होते.
Shivrajyabhishek Kolhapur : शिवरायांना मानाचा मुजरा, शहरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:47 PM
Shivrajyabhishek Kolhapur : छत्रपती शिवाजी महाराज ह्यराज्याभिषेक दिनह्ण सोहळा रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध तरुण मंडळे, तालीम, संस्था यांनी कोरोनासंबंधीची नियमावलीचे पालन करीत छत्रपती शिवाजी चौक व निवृत्ती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक आणि विविध ठिकाणी प्रतिमा पूजनाचे आयोजन केले होते.
ठळक मुद्देशिवरायांना मानाचा मुजराशहरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात