श्री विठ्ठल-रखुमाई महिला पतसंस्थेच्या २२ व्या सभेचे अहवालवाचन सचिव कुमार स्वामी यांनी केले. संस्थेला २ लाख ७२ हजारांचा नफा झाला असून, सभासदांना नऊ टक्के लाभांश जाहीर केला.
श्री दत्त विकास संस्थेच्या २९ व्या सभेचे अहवालवाचन सचिव शीतल कब्बूर यांनी केले. संस्थेला ५ लाख ६७ हजारांचा नफा झाला असून, सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला.
श्री गुड्डादेवी सहकारी दूध संस्थेच्या ४२ व्या सभेचे अहवालवाचन सचिव संगाप्पा भुसुरी यांनी केले. संस्थेला २ लाख ७७ हजारांचा नफा झाला असून, सभासदांना १० टक्के लाभांश व दूध उत्पादकांना रिबेट वाटप करण्यात आले.
श्री महालक्ष्मी ग्रा. बि. शे. पतसंस्थेच्या ४० व्या सभेचे अहवालवाचन सचिव सत्याप्पा बंदी यांनी केले. संस्थेला २० लाख ५४ हजाराचा नफा झाला असून, सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर केला. मृत सभासदांच्या वारसांना सहाय्य निधी वाटप करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चंदगड विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल करिगार यांचा, तंटामुक्त अध्यक्ष निवडीबद्दल मल्लाप्पा भोई, उपसरपंच राजू चौगुले, उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य अजित बंदी यांचा सत्कार झाला.
यावेळी संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. आण्णासाहेब पाटील यांनी आभार मानले.