शिवाजी विद्यापीठाचा समद्धी फौंडेशनतर्फे सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 05:50 PM2018-07-17T17:50:17+5:302018-07-17T17:53:11+5:30

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे उद्योगात परिवर्तन करण्यासाठी त्यांना पाठबळ, प्रोत्साहन देणे व मार्गदर्शन करणे, यासाठी शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि सांगली येथील समृद्धी टीबीआय फौंडेशन यांच्यादरम्यान मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.

The Memorandum of Understanding by Shivaji University's Samadhi Foundation | शिवाजी विद्यापीठाचा समद्धी फौंडेशनतर्फे सामंजस्य करार

शिवाजी विद्यापीठाचा समद्धी फौंडेशनतर्फे सामंजस्य करार

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाचा समद्धी फौंडेशनतर्फे सामंजस्य करारविद्यार्थ्यांच्या कल्पनांचे उद्योजकीय परिवर्तन करण्यासाठी प्रोत्साहन

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे उद्योगात परिवर्तन करण्यासाठी त्यांना पाठबळ, प्रोत्साहन देणे व मार्गदर्शन करणे, यासाठी शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि सांगली येथील समृद्धी टीबीआय फौंडेशन यांच्यादरम्यान मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, डॉ. एस. बी. काळे, डॉ. एस. डी. डेळेकर, समृद्धी फौंडेशनच्या संस्थापक सहसंचालक रेणुका पाटील आणि ज्योती यादव यांच्या उपस्थितीत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि समृद्धी फौंडेशनचे संस्थापक संचालक मनीष पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या सुविधेमुळे कौशल्य विकास अध्यापनशास्त्राद्वारे रोजगार निर्मिती आणि कुशल उद्योजक निर्माण होणे शक्य होईल. अभियांत्रिकीसह नवसंकल्पनांचे आविष्करण करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही यामुळे संधीचे एक महत्त्वाचे द्वार खुले होत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

या कराराअंतर्गत सिंगापूर येथील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, चीनमधील फुदान विद्यापीठ व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था यांच्या समन्वयातून हा नवसंकल्पनांच्या उद्योजकीय परिवर्तनाचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी निर्माण करणारे कुशल तंत्रज्ञ तयार झाले पाहिजेत, या अनुषंगाने ‘जुगाडफंडा डॉट कॉम’ या वेबसाईटमार्फत हा उपक्रम समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यामध्ये सर्व क्षेत्रांतील विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना प्रोत्साहन देऊन नवउद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे मनीष पाटील यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग यासाठी अधिकृत केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहे. ‘जुगाडफंडा डॉट कॉम’ या आयटी पोर्टल प्लॅटफॉर्ममार्फत विद्यार्थ्यांना अधिकृत केंद्राशी संपर्क साधता येणार आहे.

Web Title: The Memorandum of Understanding by Shivaji University's Samadhi Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.