‘अण्णासाहेब पाटील’ महामंडळाचे राज्य नियोजन मंडळात विलीनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:30+5:302021-05-06T04:26:30+5:30
कोल्हापूर : राज्याच्या बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे विलीनीकरण राज्य नियोजन मंडळात करण्याचा निर्णय ...
कोल्हापूर : राज्याच्या बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे विलीनीकरण राज्य नियोजन मंडळात करण्याचा निर्णय घेतला. राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच राजेश क्षीरसागर यांच्यावर दिली असून, ‘अण्णासाहेब पाटील महामंडळा’चे विलीनीकरण राज्य नियोजन मंडळ करून नियोजन विभागाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर अधिकची जबाबदारी दिली.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना १९९८ मध्ये केली आहे. बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनविणे, योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे ही या महामंडळाची उद्दिष्टे आहेत. हा सर्व कारभार राज्य नियोजन मंडळाच्या अखत्यारीत घेण्याचा आणि महामंडळ राज्य नियोजन मंडळात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला.
कोट...
संधीच्या माध्यमातून मराठा समाजातील युवा वर्गास स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रगतिपथाकडे नेऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा आपला प्रयत्न असेल. राज्य नियोजन मंडळ आणि ‘अण्णासाहेब पाटील विकास महामंडळा’चा कारभार लोकहितार्थ करू.
- राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ