दुभत्या जनावरांच्या किमती भिडल्या गगनाला

By admin | Published: February 27, 2015 10:16 PM2015-02-27T22:16:10+5:302015-02-27T23:19:58+5:30

दूध संकलनात घट : पशुखाद्यांचे दरही वाढल्याने नफा कमी; दूध उत्पादक शेतकरी चिंतेत

Milk cattle prices hit the garnet | दुभत्या जनावरांच्या किमती भिडल्या गगनाला

दुभत्या जनावरांच्या किमती भिडल्या गगनाला

Next

शिवराज लोंढे - सावरवाडी -गाव तिथं दूध डेअऱ्यांची वाढती संख्या, दुधाला उत्पादित खर्चाच्या आधारे दर मिळत नाही. पशुखाद्यांच्या दरात झालेली दरवाढ या पार्श्वभूमीबरोबर बाजारात सध्या दुभत्या जनावरांच्या किमतीत वाढ झाल्याने दुग्ध व्यवसायासमोर मोठी समस्या उभी आहे. याचा ग्रामीण भागात दूध उत्पादन संकलनावर परिणाम होऊ लागला आहे.
ग्रामीण भागात शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य आहे. मात्र, दुभत्या जनावरांच्या किमती वाढल्याने दुग्ध व्यवसायात मोठी गुंतवणूक तसेच इतर खर्चाचे वाढते प्रमाण यामुळे अल्प नफा मिळू लागला आहे. वैरणीची टंचाई, पशुखाद्यांचे भडकलेले दर, मजुरी, यांचा मेळ घालणे शेतकऱ्यांना सध्या परवडत नाही. म्हैशीच्या खरेदी दरात ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. जर्शी गायीच्या किमतीत २५ हजार ते ४५ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कर्ज काढून दुभती जनावरे खरेदी करून दूध उत्पादन करणे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून परवडत नसल्यामुळे जनावरे पाळणे कमी होऊ लागले आहे.
आठवडी बाजारात सामान्य शेतकऱ्यांना जातिवंत जनावरे मिळतील यांची खात्री नाही. बाजारामध्ये व्यापारी लोकांकडून गायी-म्हैशी खरेदीमध्ये फसवणुकीचे प्रकार घडू लागले आहेत. व्यापारी लोकांनी दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीत दरवाढ केल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जनावरांच्या विक्रीनंतर शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून पैसे वेळेत दिले जात नाहीत. पैशांसाठी अनेकवेळा शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे
लागतात.
एकंदरीतच दुभत्या जनावरांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. परिणामी, दूध उत्पादनात घट होऊ लागली आहे. पशुखाद्याच्या दरात झालेली दरवाढ, दूध संस्थांमधील फॅट दरात होणारा सावळागोंधळ, दूध संस्थांतील गैरव्यवहार या साऱ्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.


दुभत्या जनावरांच्या किमती वाढल्याने शेतकरी वर्ग जादा दराने जनावरे खरेदी करून दूध व्यवसाय करीत नाही. दुधाला उत्पादित खर्चाच्या आधारे दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग जादा जनावरे पाळत नाही. दुग्ध व्यवसायासमोर मोठ्या समस्या आहेत. त्यामुळे दुधाचे उत्पादन घटू लागले आहे.
- रघुनाथ वरुटे,
दुग्ध उत्पादक शेतकरी, बहिरेश्वर


दुभत्या जनावरांच्या
कि मती भडकल्याने शेतकरी वर्ग चिंतेत
ग्रामीण भागात दूध फॅटमध्ये सावळा गोंधळ
दूध संस्था राजकीय स्वार्थासाठी बनल्या
राजकारणाचे अड्डे
दुधाला उत्पादन खर्चाआधारे दर मिळत नाही
दूध संस्थांच्या दूध उत्पादनात घट

दुभत्या जनावरांच्या वाढलेल्या किमती
पंढरपुरी पहिली रेडी = २० ते २५ हजार रुपये
मुऱ्हा म्हैस =
३० ते ५० हजार रुपये
जर्शी गाय =
२५ ते ४० हजार
गावठी म्हैस =
२० ते ४५ हजार

Web Title: Milk cattle prices hit the garnet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.