ग्रामविकासमंत्र्यांचा आजीने ताफा अडवून मांडली गटरची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 05:04 PM2021-07-27T17:04:41+5:302021-07-27T17:08:19+5:30
Minister Hasan Musrif Kagal Kolhapur : मंत्र्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा मंत्रीमहोदय कोणत्या गाडीत आहेत याची कल्पना नसते.मात्र,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे अगदी सामान्य माणसालाही आपलेसे वाटणारे आणि अगदी सहज उपलब्ध होणारे व्यक्तीमत्व. त्यामुळे बानगे(ता. कागल) येथिल ८० वर्षीय श्रीमती येसाबाई गणपती मगदूम या आजीने पावसाळ्यात गटरचे पाणी आपल्या घरात येते. ही समस्या थेट ग्रामविकासमंत्र्यांना त्यांचा ताफा अडवून कानावर घातली.
दत्ता पाटील
म्हाकवे : मंत्र्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा मंत्रीमहोदय कोणत्या गाडीत आहेत याची कल्पना नसते.मात्र,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे अगदी सामान्य माणसालाही आपलेसे वाटणारे आणि अगदी सहज उपलब्ध होणारे व्यक्तीमत्व. त्यामुळे बानगे(ता. कागल) येथिल ८० वर्षीय श्रीमती येसाबाई गणपती मगदूम या आजीने पावसाळ्यात गटरचे पाणी आपल्या घरात येते. ही समस्या थेट ग्रामविकासमंत्र्यांना त्यांचा ताफा अडवून कानावर घातली.
समस्या किरकोळ असली तरी त्या कुंटुंबासाठी त्रासदायकच होती.याची जाणीव होवून मुश्रीफांनी स्थानिक प्रशासनाला याबाबत सुचना दिल्याच त्याशिवाय या गटारीसह आजीच्या घरासमोरील रस्ताही डांबरीकरण करून देण्याचे अभिवचन देवून ग्रामस्थांना सुखद धक्काच दिला.
बानगेतील पूरबाधित गल्ल्यांची पाहणी करून ना मुश्रीफ परतत असताना अंबाबाई मंदिरासमोर येसाबाई चक्क त्यांच्या गाडीसमोरच उभी ठाकली.आजीबाईंना तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे दूर करत होत्या.परंतु,मुश्रीफानी तहसीलदारांनाच थांबवत त्या आजीचे गाऱ्हाणे ऐकून घेतले.
हीच खरी लोकशाही........!
गेल्या ३५ वर्षांपासून सामाजिक जीवनात गोरगरीब जनतेच्या पाठबळावरच यशस्वी वाटचाल करत आहे.जनतेशी माझी नाळ घट्ट जुळलेली आहे.८० वर्षीय आजी बिनदिक्कतपणे गाडी अडवून हक्काने काम सांगते.हा माझ्या कार्यपद्धतीचा खराखुरा विजय असल्याचे सांगत हीच खरी लोकशाही म्हणावे लागेल अशी भावनिक प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली.