मंत्री मुश्रीफ यांची बदनामी सहन केली जाणार नाही : राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:31 AM2021-09-16T04:31:10+5:302021-09-16T04:31:10+5:30
कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून व महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोतच, तसेच महाविकास आघाडी ...
कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून व महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोतच, तसेच महाविकास आघाडी सरकारदेखील मंत्री मुश्रीफ यांच्या मागे खंबीरपणे उभे राहील, असे सांगून मंत्री यड्रावकर म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत चांगल्याप्रकारे काम करीत असताना हे सरकार कमकुवत करण्यासाठीचे सर्व ते प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत. यासाठी सर्व प्रकारच्या शासकीय यंत्रणेसह समर्थकांचा वापर केला जात आहे. मंत्री मुश्रीफ यांच्यावरील आरोप याचाच भाग आहे. स्वत:च्या कर्तृत्वाने जनमानसात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून रात्रंदिवस जनतेची सेवा करणाऱ्या नेतृत्वाला अशा पद्धतीने बदनाम केले जात असेल तर ही बाब कोल्हापूरची जनता कधीही सहन करणार नाही. केवळ त्यांचा लौकिक ज्यांना पाहवत नाही अशा मंडळींनी त्यांच्यावर आरोप करणे थांबवावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.