राजापूर बंधाऱ्याची राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 03:50 PM2020-08-17T15:50:03+5:302020-08-17T15:52:07+5:30

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील बंधाऱ्यास भेट देवून पूर परस्थितीची पाहणी केली.

Minister of State Rajendra Patil-Yadravkar inspects Rajapur Dam | राजापूर बंधाऱ्याची राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून पाहणी

राजापूर बंधाऱ्याची राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून पाहणी

Next
ठळक मुद्देराजापूर बंधाऱ्याची राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून पाहणीकर्नाटकच्या पाटबंधारे मंत्र्यांशी पुन्हा संपर्क; अलमट्टीतून २.५० लाख क्युसेकचा विसर्ग

कोल्हापूर: सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील बंधाऱ्यास भेट देवून पूर परस्थितीची पाहणी केली.

यड्रावकर यांनी आज नृसिंहवाडी, कुरूंदवाड या परिसरातीलही पूर परिस्थितीची पाहणी करून या ठिकाणी राबवायच्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यड्रावकर यांनी कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी आज पुन्हा चर्चा करुन अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची मागणी केली.

या मागणीला प्रतिसाद देत अलमट्टीमधून आज  २ लाख ५० हजार इतका विसर्ग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पूरपरिस्थितीसंदर्भात दोन्ही राज्यात समन्वय ठेवून पूर नियंत्रण केले जाईल, असे जारकीहोळी म्हणाल्याची माहिती राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिली.

Web Title: Minister of State Rajendra Patil-Yadravkar inspects Rajapur Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.