मुरगूड नगराध्यक्षांना शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:02 AM2018-01-13T01:02:55+5:302018-01-13T01:02:55+5:30
मुरगूड : येथील बाजारपेठेतील हुतात्मा स्मारकाच्या शेजारील विनापरवाना दुकान गाळ्याला विरोध का केला म्हणून मंडलिक गटाचे माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर आणि पांडुरंग भाट यांनी नगराध्यक्ष केबिनमध्येच नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकारचा निषेध करत पालिकेतील कर्मचाºयांनी नगराध्यक्ष जमादार यांची बाजू उचलून धरत दुपारनंतर काम बंद आंदोलन केले. शिवीगाळ करणाºयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाºयांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अधिक माहिती अशी, शहराची पाहणी करताना अधिकाºयांना बाजारपेठेमधील हुतात्मा स्मारकाच्या शेजारी भडगाव येथील भगवान दिनकर माने हे विनापरवाना दुकानगाळ्याचे काम सुरूअसल्याचे दिसले. स्मारकाचे पावित्र्य जपण्यासाठी स्मारकाच्या सभोवताली असणाºया टपºया, खोक्या बाजूला काढण्याच्या नोटिसा लागू केल्या असताना हा नवीन गाळा तिथे नको म्हणून अधिकाºयांनी आणि नगराध्यक्षांनी बांधकामास विरोध केला.
दरम्यान, सदरचा दुकानगाळा घालणारा माने हा मंडलिक गटाचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याला दुकानगाळा घालण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करत माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर आणि पांडुरंग भाट, नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्याकडे गेले. त्याठिकाणी त्यांनी जमादार यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करत धमकावण्याचा प्रयत्न केला. पण जमादार आपल्या भूमिकेवर ठाम होते, आपण बेकायदेशीर काम करणार नाही, असे सांगताच येरुडकर आणि भाट हे दोघे धाऊन जमादार यांच्या अंगावर गेले. त्याठिकाणी असणाºया अन्य कार्यकर्त्यांनी त्यात भाग घेत त्यांना रोखले. दरम्यान, ही माहिती कर्मचाºयांना समजताच सर्वजण नगराध्यक्षांच्या केबिनसमोर एकत्र आले. या घटनेचा निषेध करत सर्व कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन सुरू केले. शिवाय शिवीगाळ करणाºयांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिले. आदींच्या सह्या आहेत. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.
बेकायदेशीर काम करणार नाही
या स्मारकासाठी १३ लाखांचा निधी मिळाला आहे. त्यातून त्याचे सुशोभीकरण सुरू आहे. त्यामुळे याच्या शेजारी अतिक्रमण करून खोकी घालू देणार नाही. या कामाला विरोध केला म्हणून येरुडकर आणि भाट यांनी आपल्याला शिवीगाळ करत अंगावर धावून आले. नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तींकडून असे वर्तन योग्य नाही. त्यामुळे काही झाले तरी शहराच्या भल्यासाठी आपण बेकायदेशीर काम करणार नाही. - राजेखान जमादार, नगराध्यक्ष