दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त आज मॉर्निंग वॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:28 AM2021-08-20T04:28:04+5:302021-08-20T04:28:04+5:30
कोल्हापूर : अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज, शुक्रवारी दहावा स्मृतिदिन असून, यानिमित्ताने सकाळी साडेसात ...
कोल्हापूर : अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज, शुक्रवारी दहावा स्मृतिदिन असून, यानिमित्ताने सकाळी साडेसात वाजता शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथून बिंदू चौकपर्यंत मॉर्निंग वॉक काढण्यात येणार आहे.
कोल्हापूर शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात डॉ. गोविंद पानसरे समता संघर्ष समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईबद्दल जाब विचारण्याच्या हेतूने मॉर्निंग वॉकबरोबरच सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
पानसरे संघर्ष समितीच्या बैठकीस गौतम कांबळे, सुनीता अमृतसागर, अनमोल कोठाडिया, सीमा पाटील, रमेश वडणगेकर, निशांत सुनंदा विश्वास, ऐश्वर्या कावेरी संजय, मुक्ता निशांत, प्रमोद शिंदे, यश आंबोळे, समीर बागवान, राजेंद्र यादव उपस्थित होते.